Print Page | Close Window

जोगवा मागणारीच लेण

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Caves in Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Caves in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=268
Printed Date: 26 Dec 2024 at 11:32pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: जोगवा मागणारीच लेण
Posted By: amitsamant
Subject: जोगवा मागणारीच लेण
Date Posted: 03 Oct 2014 at 12:11pm

Caves in India, Jain leni, Sutonda Fort Caves in India, Jain leni, Sutonda Fort
सुतोंडा किल्ल्याच्या (नायगावचा किल्ला) चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. स्थानिक लोक याला "जोगवा मागणारीच लेण" किंवा "जोगणा मांगीणीच घर" या नावाने ओळखतात. हे जैन लेण आहे. यातील पहील्या लेण्याला दोन दालन असून बाहेरच्या पडवीला दोन खांब आहेत. पहिल्या दालनाच्या व्दारपट्टीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे, पण ती आता बरीच पुसट झालेली आहे. पहील्या दालना मध्ये उजव्या बाजूला मांडीवर मुल असलेल्या स्त्रीची २.५ फूट उंच मुर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूला गंधर्वाची २ फूट उंचीची मूर्ती भिंतीतच कोरलेली आहे. आतील दुसरे दालन चौकोनी आहे. त्यात कोणतेही कोरीव काम किंवा मुर्ती नाही. पहील्या लेण्यापासून थोड पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या प्राचीन पायर्‍या दिसतात. या पायर्‍यांनी वर गेल्यावर दगडात कोरलेल दुसर लेण पहायला मिळत. लेण्याच्या दर्शनी भागात दोन खांब कोरलेले आहे. आत बसण्यासाठी भिंती लगत दगडी बाक कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेर पाण्याच टाक कोरलेल आहे. हे लेण पाहून परत मुळ पायवाटेवर येऊन किल्ला उतरावा. या लेण्याकडे जाणारी पायवाट मळलेली नाही, तसेच बर्‍याच स्थानिक लोकांनाही या लेण्याचा नक्की ठाव ठिकाणा माहीत नाही . गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल. 

Caves in India, Jain leni, Sutonda Fort Caves in India, Jain leni, Sutonda Fort

याशिवाय सुतोंडा किल्ल्यावर २ लेणी आहेत. पण त्यात कुठल्याही मुर्ती नाहीत. सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.

जाण्यासाठी :- स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून ३ मार्गांनी सुतोंडा गडावर जाता येते :-

१) औरंगाबाद - चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

३) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

नायगाव गावातून बाहेर पडल्यावर आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. या मार्गाने किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली साधारणपणे किल्ल्याच्या अर्धा उंचीवर डाव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे. ५ मिनिटात कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. त्या लेण्यांपाशी घेऊन जातात.
गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल. 

http://trekshitiz.com/marathi/Sutonda%28Naigaon_Fort%29-Trek-S-Alpha.html" rel="nofollow - सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.


आजूबाजूची पहाण्याची ठिकाणे :- सुतोंडा किल्ला, http://trekshitiz.com/marathi/Antoor-Trek-A-Alpha.html" rel="nofollow - अंतुर किल्ला ,

Caves in India, Jain leni, Sutonda Fort
Sutonda, Sutonda Fort, Naigaon Fort, Naigaoncha killa, Antur, Forts in Aurangabad, Caves in Aurangabad



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk