कड्यावरचा गणपती (आंजर्ले) गावाचे नाव :- आंजर्ले जिल्हा :- रत्नागिरी जवळचे मोठे गाव :- दापोली, मुरुड हर्णे.
दापोली आणि मुरुड हर्णे जवळ असलेल्या आंजर्ले या निसर्गरम्य गावात गणपतीचे प्राचिन मंदिर आहे. फ़ारपूर्वी आंजर्ल्याजवळ समुद्रात एका खडकावर अजरालयेश्वर आणि गणपतीचे मंदिर होते. सागळपातळीत वाढ झाल्यामुळे जुनी मंदिरे सागराच्या पाण्यात गडप झाली. त्यामुळे नविन मंदिर उण्च जागी डोण्गराच्या कड्यावर बांधण्यात आले. हा गणपती कड्यावरचा गणपती या नावाने प्रश्ध्द झाला. सध्या बांधलेल्या मंदिराचा जिर्णोध्दार १७७० मधे करण्यात आलेला आहे. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असे ३ भाग आहेत. सभामंडपात कारंजे आहे. गाभार्यातील गणेश मुर्ती उजव्या सोंडेची असून पावणे दोन मीटर उंचीची आहे. मंदिरा समोर दगडी बांधणीचे तळे आहे.
जाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीमार्गे १५ किमी वरील आंजर्ले गावात जाता येते. गाडीने थेट मंदिरापाशी पोहोचता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Suvarnadurg-Trek-S-Alpha.html" rel="nofollow - सुवर्णदुर्ग , http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Goa_Fort-Trek-G-Alpha.html" rel="nofollow - गोवा , http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kanakdurg-Trek-K-Alpha.html" rel="nofollow - कनकदुर्ग २) http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/topic302_post559.html#559" rel="nofollow - केशवराज मंदिर, आसुद. ३) व्याघ्रेश्वर मंदिर, आसुद. ४) http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic301.html" rel="nofollow - दुर्गादेवी मंदिर, मुरुड हर्णे. वरील सर्व ठिकाणांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Kadya varcha Ganpati, Anjarle. Ganpati Mandir , Anjarle, Ganpati Temple , anjarle, Ganesh Temple , Anjarle. Temples in Kokan , Temples near Dapoli, Temples in Ratnagiri District.
|