गावाचे नाव :- सिन्नर जिल्हा:- नाशिक जवळचे मोठे गाव :- सिन्नर, नाशिक
मुंबई - शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगत गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात बांधल असावे. गोंदेश्वर मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी आहे.या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्यावर (अधिष्ठाण) मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दोन छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपल लक्ष वेधून घेतात.
गोंदेश्वराचे मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य दार उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) गारगोटी म्युझियम , सिन्नर. २) नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य २५ किमी. ३) नाशिक शहर ३० किमी.
जाण्यासाठी :- नाशिकहून ३० किमी अंतरावर सिन्नर गाव आहे. नाशिक - शिर्डी मार्गावर हे गाव आहे. सिन्नर गावातील तहशीलदार कार्यालयाच्या बाजूला रस्त्यालगतच गोंदेश्वराचे मंदिर आहे. नाशिक ते सिन्नर अशी बस सेवा उपलब्ध आहे.
मुंबई - घोटी - सिन्नर हे अंतर १८५ किमी आहे. मुंबई ते घोटी मुंबई आग्रा हायवेने येऊन घोटी येथे हायवे सोडून (नाशिक बायपास) रस्त्याने सिन्नर गाठावे. याच रस्त्याने पुढे शिर्डीला जाता येते.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Gondeshwar Mandir :- Village :- Sinnar, Dist :- Nasik, Nearest city :- Sinnar, Nasik, Shirdi, Ghoti, Igatpuri.
|