दरवर्षीप्रमाणे
आम्ही मित्रमंडळीनी याही वर्षी दिवाळीत किल्ला बांधणी तसेच इतर उपक्रम राबवले.पण या
वर्षी कोणत्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.पण ऐन दिवाळीत आमच्या मित्राचा मित्र या
नात्याने ट्रेकक्षितीज संस्थेचा मेम्बर तुषार
धुरी हा आमचा किल्ला पाहण्यास आला व त्यानेच आमची शेवटच्या क्षणी ट्रेकक्षितीज आयोजित
किल्ला बांधणी स्पर्धेत एन्ट्री करून घेतली.दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे परीक्षक येऊन
किल्ला बघून गेले व नंतर आमच्या राजगड किल्ला प्रतिकृतीस तिसरे पारितोषिक मिळाले हे
त्यांच्यामार्फत कळवण्यात आले पण त्याच सोबत किल्लाबांधणी स्पर्धकांसाठी संस्थेतर्फे
"सुरगड ट्रेक"आयोजित केला होता म्हणून आम्हाला सुरगड ट्रेकची संधी मिळाली
त्याबद्दल तुषार धुरी चे आमच्या मित्र परिवाराकडून खूप खूप आभार मानतो.
मित्रांपैकी
जे Available होतो त्यांची नाव आम्ही ट्रेक-लिडर यांना कळवली.
(मी
दरवेळी ट्रेकला जाताना माहिती गोळा करण्याच्या सवयीमुळे याही वेळी सूरगडाविषयी थोडी-फार
माहिती गोळा केली होती.)
अखेर
तो दिवस उजाडला.९ नोव्हेंबर २०१४ रविवार
ई-मेल
मध्ये दिलेल्या ट्रेकच्या रूपरेषेनुसार सकाळी ५.४५ ला सर्वांना डोंबिवलीतील बागडे बुक
डेपो जवळील शिवाजी पुतळ्याजवळ भेटायचे होते.आम्ही मित्रमंडळी(मी,अमेय,प्रथमेश,विनीत)तेथे
वेळेत पोहचलो.तिथे काही ट्रेक मेम्बर्स उभे होते.त्यांच्याशी आम्ही ओळख व थोड्या गप्पा
मारल्या.थोड्याच वेळात सुरगड ट्रेकची लिडर (दिपाली लंके)ही आली.तिने स्वतःचा परिचय
दिला व सर्वांशी थोडा परिचय करून घेतला.आम्हाला असे कळले कि दिपाली ही पुण्यात राहते
व ती ट्रेकसाठी आदल्यादिवशी ठाण्यात आली आणि मग सकाळी ON-time डोंबिवलीत. गड-किल्ले
पाहण्याची आवड व त्यासाठी घरातून असलेला support पाहून खरच कौतुक व अभिमान वाटला.हळू
हळू मेम्बर्स येत होते आणि मग बघता बघता मेम्बर्स ची संख्या ४४ वर पोचली आणि मग आम्ही
प्रायवेट बस मध्ये बसलो.गणपती बाप्पा मोरया आणि शिवाजीं महाराज्यांच्या घोषणेने आमचा
ट्रेक प्रवास सुरु झाला.सकाळी सकाळी हलका हलका गार वारा मन सुखावत होता.बस- प्रवासात
सौरभ शेट्ये यांनी शिवगीते,पोवाडे म्हणून तसेच आम्ही-सर्वांनी त्यांना चांगली साथ देऊन
जोशपूर्ण वातावरण निर्मिती केली.त्यानंतर सर्वजण गप्पा मारण्यात तल्लीन झाले.मग ८.००
च्या सुमारास गरमा-गरम उपम्याचा नाश्ता ट्रेकक्षितीज संस्थेतर्फे आम्हाला बसमध्ये देण्यात
आला.
चालत्या-हलत्या बसमध्ये डिश-मधील उपमा खाण्यात सर्वांचीच कसरत सुरु होती.पेट-पूजा
झाल्यावर आम्ही पुन्हा गप्पा,गाणी,झोप कार्यक्रमात गुंग झालो,आणि थोड्याच वेळात आम्ही
एका छोट्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबलो.तेथे आमच्या सोबत आलेल्या महेंद्र गोवेकर
दादांशी आमची ओळख झाली.चहा घेता-घेता त्यांचासोबत आम्ही गडकिल्ल्यांविषयी/ट्रेकिंग
अनुभवाविषयी गप्पा मारल्या आणि मग बसमध्ये बसून सुरगडसाठी प्रवास सुरु केला.थोड्याच
वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी असणार्या खांब गावी व घेरा-सूरवाडीत पोचलो.बसमधून उतरल्यावर
सगळे मेम्बर्स ट्रेकसाठी goggle,caps, इतर सामान घेऊन तयार झाले.
मग गावातील शाळेच्या
मैदानात आम्ही सर्व जमलो.तेथे थोडा परिचय कार्यक्रम आणि लिडरतर्फे गडावर जाण्याबाबत
घ्याची काळजी आणि इतर सूचना देण्यात आल्या.
मग आम्ही घोषणा देऊन गड चढण्यास सुरुवात
केली.मळलेली पायवाट तुडवत तुडवत आम्ही एका जंगलात शिरलो.तेथून रानवाटा मार्गक्रमण करत-करत
१ तासात आम्ही एका पठारासारख्या जागेवर पोहचलो.तेथे थोडा आराम करून तसेच फोटोसेशन करून
परत गड चढण्यास सुरुवात केली.खर तर रानवाटेतून जायची मज्जा वेगळीच ...तसेच आपल्यासोबत
आणलेली बिस्किटे,फळ(संत्री,सफरचंद) यामुळे तोंडाची चक्की तशी सुरु होतीच व त्यात आमचे
ग्रुप लिडर सौरब शेट्ये यांच्या विनोदांमुळे हसत-बागडत आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यात
पोचलो.तेथे उजव्या बाजूस कातळात कोरलेली पाण्याची तळी पाहून परत गडाच्या पुढच्या टप्यात
जाण्यास निघालो. तेथून
पुढे एक Rock-patch
पार करून आम्ही गडाच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून
प्रवेश केला. Rock-patch पार करण्यात ट्रेक
को- लिडर सचिन महाडीक यांनी सर्वाना चांगले सहकार्य केले. तेथून पुढे हनुमान मंदिर
होते .मिशा आणि कमरेला खंजीर असलेली हनुमानाची आगळी-वेगळी मूर्ती आम्ही पाहिली.
पुढे उजव्या
बाजून जाऊन गडाचा असलेला एक बुरुज पहिला. तेथे
माझा मित्र अमेय काटदरेने दरवेळीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे प्रतिक भगवा झेंडा आणला
होता,त्यासोबत आम्ही सर्वांनी ग्रुप फोटोसेशन केले.
मग परत मूळजागी परतून डाव्या बाजूने
थोडे चढून गेल्यावर कोठाराचे अवशेष पाहिले.ते पाहून आम्ही पुढे मार्गक्रमण केले. तेथे
पाण्याच्या ४-५ टाक्या/कुंड तसेच उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष होते ते पाहून पुढे गेल्यावर
एक बुरुज लागतो तेथून आम्ही एका वाटेने पुढे गेलो तेथे एक प्राचीन शिलालेख पाहिला.
तेथील
पुढील पठरासारख्या जागेवर आम्ही सर्वांनी बस्तान ठोकले. गडावरून दिसणार कुंडलिका नदीचे
पात्र,घनदाट अरण्य, ढोलवाल
धरण सर्व दृश्य नयनरम्य होते.सर्वांनी
सोबत आणलेलं जेवणाचे डब्बे उघडले.४४ जणांसोबत घेतलेला भोजनाचा आस्वाद म्हणजे खरचं अविस्मरणीय!!एक
प्रकारची दावतच(मेजवानीच) जणू.वेगवेगळ्या प्रकारचे मेनू.पराठे,इडली,sandwich,भाजी-पोळी,भुर्जी-पाव
लाडू-चिवडा,भाकरवड्या सगळ्या पदार्थांची नुसती
चंगळच.सर्वांनी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
जेवणानंतर सर्वांनी थोडा आराम केला.त्यानंतर ट्रेकक्षितीज
संस्थेची माहिती तुषार धुरी यांनी सर्वाना दिली,मग महेंद्र दादा(परिचय:-"नकाशातून
दुर्गभ्रमंती" पुस्तकातून १२५ गडकिल्ल्यांची माहिती व नकाशे यांचे लेखन)यांनी
सूरगडाविषयी माहिती व सर्व गडांच्या महत्वाच्या भागांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.त्यामुळे
खरचं आमच्या गड-किल्ल्यांच्या ज्ञानाला खत-पाणी मिळाले. त्यानंतर दु ४.००च्या सुमारास
ट्रेकलिडर दिपाली ने सांगितल्यानुसार आम्ही सर्वांनी मग दुसर्या मार्गाने(चोरमार्ग)
गड उतरण्यास सुरवात केली.
परत गप्पा ,जोक्स सुरूच होते. काही अंतर उतरल्यावर एक ठिकाणी लावलेल्या अन्साई देवीचे मंदिर आणि तोफेकडे या दिशादर्शक
फलक बघून तेथील अन्साई मंदिर आणि तोफ शोधून
बघून आलो आणि ५.४५ ला गड उतरून बस जवळ जमलो.मग गावकर्यांकडून मस्त पाणी पिऊन तृप झालो.तसेच बसजवळ ग्रुप फोटोसेशन केले
आणि ६ च्या सुमारास परतीच्या
प्रवासास सुरुवात केली.(यावेळी मला इतर ट्रेकला वाटणारी गाडी चुकेल,ट्रेन सुटेल,बस
भेटणार नाही, उशीर होईल अशी काळजी नव्हती).
बस-प्रवास सुरु झाला व काही वेळातच आम्ही चहा-नाश्त्यासाठी सकाळच्याच हॉटेल वर थांबलो.तेथे
गरम-गरम पोहे आणि चहा आणि महेंद्र दादा यांच्यासोबत इतिहास,किल्ले अशा अनेक गोष्टींवर गप्पा...खूपच समाधान!!!
नंतर परतीचा प्रवास सुरु.बसप्रवासात
मग सर्वांचे अभिप्राय व पूर्ण दिवसाचा अनुभव लिडर दिपालीने विचारले.सर्वांचे Experience
आणि Suggestion सांगून
झाल्यावर राहुल मेश्राम ,सौरब शेट्ये,महेश मुठे यांची जबरदस्त गाण्याची मेहफिल जमली..त्यात
त्यांना सर्वांनी भरपूर साथ दिली. एकेकाचे
सूर लागतच होते एका अर्थी सुरगड ट्रेक तेव्हाच सार्थकी झाला असे म्हणायला काही हरकत
नाही. दमलेले-भागलेले ट्रेकर्स आपला शीण विसरून एकदम जोश मध्ये गाऊ-नाचू लागले..त्यामुळे
एकदम वातावरण उत्साही झाले आणि त्यात महेश मुठे कडून मिळालेली सर्वांना Ice-cream
Treat म्हणजे सोने पे सुहागाच!!!
गाता-गाता
कधी पनवेल आले समजलेच नाही तेव्हा दिपाली लंकेला (पनवेलहून पुणे गाडी असल्यामुळे) आम्ही
निरोप देऊन परत गाण्यात धुंद झालो..गाण्याच्या धुंदीत कधी आम्ही डोंबिवलीत पोहचलो समजलच नाही. सर्व ट्रेकर्स मित्रांचा निरोप घेऊन
आम्ही रात्री १०.३० च्या सुमारास घरी परतलो.
अशा
प्रकारे आमचा सुरगड ट्रेक एकदम अविस्मरणीय आणि छानच झाला.
ट्रेक
दरम्यान आलेले अनुभव:-
·
Trek
leader दिपालीच उत्तम नेतृत्व!तसेच सगळ्यांना गड चढताना केलेले motivation /cheer
up.
·
Trek
accountant राहुल चे उत्तम आर्थिक नियोजन.
·
Co-leader
सचिन महाडिक तसेच इतर trekshitiz मेम्बर्सच चांगले
सहकार्य.
·
तसेच
ट्रेक ला आलेले प्रदीप लाहोटी काका आणि १२ वर्षानंतर ट्रेक करणारी सुवर्णा यांची गडकिल्ले पाहण्याची
आवड आणि इच्छा-शक्ती पाहून खरच अभिमान आणि कौतुक वाटले.सुवर्णा थकत होती तेव्हा दिपाली
आणि तुषार यांनी तिला प्रत्येकवेळी cheer up केले आणि तिच्याकडून गड पूर्ण सर करून
घेतला.
·
(माझ्या
ट्रेक प्रवासातला ४४ जण एवढ्या मोठ्या संख्येने मेम्बर्स असलेला माझा 1st ट्रेक
.Thanks to trekshitiz)
·
असा दुर्लक्षित आणि अनोळखी किल्ला
पाहून आनंद झाला तसेच ओळखीच्या किल्ल्यान्सोबत इतर दुर्लक्षित/अनोळखी किल्ले आपण बघावेत
हा विचार मनात येउन गेला.
|