धनुष्यबाण
हे अतिप्राचीन हत्यार आहे जगभरातील गुंफाचित्रांमध्ये धनुष्यबाणाचा उपयोग शिकारीसाठी
केल्याचे दाखले मिळतात.अश्मयुगात प्राण्यांच्या हाडापासून, टोकदार दगडांपासून बाण बनविले जात असत ‘‘धनुर्वेद’’ या उपवेदात धनुर्विद्येची
संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.या शस्त्रात स्वत: दूर राहून शत्रूवर अचूक वार करता
येत असे. यामुळेच १८ व्या शतकात बंदुकीचा मोठ्या प्रमाणात वापर होई पर्यंत धनुष्यबाण
हे युध्दात वापरले जाणारे महत्त्वाचे शस्त्र होते. धातूचा शोध लागेपर्यंत धनुष्य लाकडाच्या
लवचिक तुकड्यापासून अथवा बांबू पासून बनवत. बाण हे बांबू, बोरु, टोकदार काठी, प्राण्यांची
हाडे यापासून बनविले जात असत. धनुष्यावर चढवण्याची दोरी (प्रत्यंचा) वनस्पतींची साल,
वेली, प्राण्यांची कातडी, प्राण्यांचे आतडे यापासून बनविली जात असे.
धातूचा
शोध लागल्यावर धनुष्य लोखंड, पोलाद, तांबे, ब्रॉन्झ यांचे बनविले जाऊ लागले. तांबे,
ब्रॉन्झ यापेक्षा लोखंडाचे बाण जास्त प्रचलित होते. आधुनिक काळात धनुष्य लाकूड, कार्बन,
फायबर ग्लास, तांबे यांचे बनविलेले असते, तर बाण पोकळ ऍल्युमिनीअम, फायबरग्लास, ग्रॅफाईट
यांपासून बनविले जातात.धनुष्याची लांबी २५ सेमी ते ५ फूटांपर्यंत असे. बाणाची लांबी
२५ सेमी ते ४ फूट असे. बाणाची टोके सूईच्या आकारापासून अर्धचंद्राच्या आकारापर्यंत
विविध रुपात असत. बाणाचा खाच असलेला मागील भाग म्हणजे ‘‘तेजना’’, हा लाकूड, हाड किंवा
हस्तिदंताचा बनविलेला असे. बाणाच्या मागील टोकावर ठराविक पक्ष्यांची पिसे लावली जात.
यामुळे बाण सरळ हवा कापत, न थरथरता जाई. पिसांना विशिष्ट कोन दिल्यास बाण हवेतून जाताना
स्वत: भोवती फिरत जाई व शरीरात घुसताना "स्क्रू" अथवा गिरमिट सारखा फिरत
जाई. असा बाण शरीरातून बाहेर काढणे अवघड जात असे. बाणाचा सरळ रेषेत टप्पा सूमारे ११०
मीटरपर्यंत असे व हवेतून ८० मीटरपर्यंत बाण जात असे.
बाणावर
अस्त्राची स्थापना करुन त्याची संहारकता वाढविली जाई. उदा. अग्नि अस्त्र :- बाणांवर पेटते बोळे लावून शत्रू सैन्यावर सोडले
जात.
युध्दाच्या सुरुवातीला बाण सोडताना त्याचा रोख शत्रूवर
असे, पण बाण आकाशाकडे टोक करुन विशिष्ट कोनात सोडले जात, असे आकाशमार्गे येणारे बाण
गुरुत्वाकर्षर्णामुळे अधिक वेगाने शत्रुच्या शरीरात खोलवर घुसत असत.
भाता: बाण ठेवण्यासाठी बांबुचा
अथवा धातूचा नक्षीकाम केलेला भाता वापरत, तो अडकविण्यासाठी चामड्याचा पट्टा वापरला
जात असे.
|