सुरगड
Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Events
Forum Description: Mountaineering and Trekking related events, Photography Competition, Audio Video Competition. Note :- Please do not add trekking events anywhere on this Discussion Board.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=284
Printed Date: 20 Nov 2024 at 4:24am Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: सुरगड
Posted By: Rahool1312
Subject: सुरगड
Date Posted: 18 Nov 2014 at 7:00pm
सुरगड किल्ला म्हटलं की, दुसरं घरचं जणू...! आणि कोकणातील किल्ले म्हणजे स्वर्गच..! ट्रेकची तयारी झाली..सकाळी लवकर उठायचं म्हटलं की माझ्या कपाळावर आठ्याचं..पण ट्रेक म्हटला की आपला जिवकी प्राण...ठरल्याप्रमाणे सकाळी 7.20 ला बस पनवेल एस टी डेपो ला येऊन थांबली. आणि 7.30 ला प्रवास सुरु तो सुरगड च्या दिशेने. माझ्या ओळखीचे जेमतेम 3-4 चेहरे ओळखीचे ते म्हणजे आपल्या लिडर, राहुल दादा, मोहन आणि उमेश...बाकी सर्व नवीन..पण ठिक आहे माहीत होत येताना बाकीचे सर्व पण ओळखीचे झालेले असतील...काही अंतर गेल्यावर उपम्याची डीश हातात आली...आहाहाहा क्या बात..भुक पण लागली होती...आता गरज होती ती चहा ची.... चहा हे पेय बाकी माझ्यासाठी अमृतच म्हणावं लागेल..कारणं ट्रेक ला जायचं आणि चहा नाही असं फार क्वचित होतं.. थोड्याच वेळात बस एका हॉटेल जवळ थांबली..चहा हातात मिळेपर्यत काही जण गप्पांमध्ये काही जण कोकणांच सौंदर्य आपल्या डोळयात कैद करत तर काही जण फोटोग्राफी मध्ये गुंतले होते...मी ही हे सगळं अनुभवत होतो...चहा घेऊन पुन्हा सुरगडाच्या दिशेने प्रवास चालु झाला..बस गावात येऊन थांबली..ऊना चा तडाखा जाणवत होता.. पुढचा हा पायी करायचा असल्याने सगळेच कँप, गाँगल, स्कार्फ घालण्यच्या तयारीस लागले..गावातल्या शाळेच्या मैदानात सगळ्यांनी आपआपला परिचय दिला.. लिडर दिपाली ने काही सुचना सांगितल्या व ट्रेक ला सुरुवात झाली..एकुण 44 जण सुरगडाच्या दिशेने ऩिघाली...गावातुन जाताना खेळत असलेली लहान मुले, घरातल्या ओट्यावर बसलेली वयस्कर मंडळी, देवळात चालु असलेली साफसफाई, पाणी भरत असलेल्या स्ञिया हे सर्व खुप कमी बघायला मिळतं शहरा ठिकाणी हे सर्व डोळ्यांत कैद करत गडाच्या वाटेला लागलो..मळलेली पायवाट तुडवत सगळे एका पाठोपाठ चलत होते..चालता चालता गप्पा पण चालू होत्या..काही जण गडाच्या भोवतालचे सौंदर्य कँमेरात कैद करत होते..12 वाजता घळीच्या मुखाशी येऊन थांबले घळीच्या बाजुलाच 2 पाण्यची टाकी व 1 भुयारी टाकं बघायला मिळालं...घळीतुन वर गेल्यावर सगळ्यांनी मारुतीचे दर्शन घेतले..तसेच उजवीकडील बुरूजावर जाऊन भोवतालचा प्रदेश न्याहाळला ...कुंडलिका नदी, घनदाट जंगल, आजुबजुचा परिसर, लहान मोठी गावे कही जण कँमेरात तर कही मनातल्या कँमे-यात कैद करत होते..एक ग्रुप फोटो झाला...व तिथुन गडाचे अवषेश न्याहाळत गडाच्या दुस-या टोकाला पोहचलो...सर्वाना भुका पण लागल्या होत्या..सर्व जण एका पठारावर थांबले...आपापले डबे उघडले...व्हा व्हा माझ्यासाठी मेजवानीच होती..करण नेहमीप्रमाणे मी स्वत: कहि आणले नव्हते..ट्रेकक्षितीच्या मेंबर्स कडुन गडाची माहीती सांगण्यात आली..आणि गडाच्या दुस-या मार्गाने उतरण्याची वाट निवडली...आणि परतीचा प्रवास सुरु झाला...अविस्मरणीय ट्रेक..! Woods are lovely, dark and deep. But I have promises to keep, And I miles to go before I sleep And I miles to go before I sleep...!
|
Replies:
Posted By: saurabhshetye
Date Posted: 18 Nov 2014 at 10:14pm
Posted By: amolnerlekar
Date Posted: 19 Nov 2014 at 9:45am
Rahul,
Chhaan lihile aahes.
Amol
|
Posted By: Rahool1312
Date Posted: 19 Nov 2014 at 9:48am
धन्यवाद...!
|
Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 19 Nov 2014 at 4:21pm
Posted By: amitsamant
Date Posted: 20 Nov 2014 at 8:41am
Posted By: chaitanya
Date Posted: 20 Nov 2014 at 9:09pm
|