कोटेश्वर मंदिर
गावाचे नाव :- शेरी लिंब जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे.
सातार्या जवळच शेरी लिंब गाव आहे. तिथे असलेल्या "बारा मोटांच्या" विहिरीमुळे ते प्रसिध्द आहे. याच गावातील कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर सुंदर "कोटेश्वर महादेव मंदिर" आहे. शेरी लिंब या छोट्याश्या गावाला अनेक थोरा मोठ्यांचे पाय लागलेत. शाहु महाराजानी देशभरातून आंब्याच्या विविध जातीची वाण जमवुन याच गावात आमराई तयार केली होती. सातार्याहुन जवळच असलेल्या या गावात ते विश्रांतीसाठी येते असत.
अठराव्या शतकातील पेशव्यांचे सरदार नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) (इ.स.१७००-१७७५) हे शेरी लिंब गावचे. त्यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि त्यातील राम मंदिर उभारल. त्याच पध्दतीने बांधलेल "कोटेश्वर शिवमंदिर" खिर्यांनी आपल्या लिंब गावात उभारल.
कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या खडकामुळे नदीच पात्र दोन भागात विभागलेल आहे. नदीवर बांधलेल्या पुलावरुन थेट मंदिरा पर्यंत जाता येते. प्रथम एक छोट गणपतीच मंदिर आहे. त्याच्यापुढे मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाला पार बांधलेला आहे. या पाराच्या खालच्या बाजुला बनवलेल्या खोबण्यात वेगवेगळया मुर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिराचे गाभारा आणि सभामंडप असे दोन भाग आहे. गाभार्या समोर नंदी आहे. गाभार्यात शिवलींग आहे.
गाभार्या समोर नदीच्या पात्राकडे तोंड करुन मंदिराचे भव्य प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून नदीच्या पात्रात उतरल्यावर समोरच एक कुंड आहे. त्या कुंडात एक नंदी बसवलेला आहे. नदीच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाने नंदी वाहुन जाउ नये आणि त्याची कमीतकमी झीज व्हावी यासाठी अशी रचना करण्यात आली असावी. प्रवेशव्दारा समोर उभ राहील्यावर उजव्या हाताला नदीच्या पात्रापासुन वरपर्यंत दगडी तट बांधुन काढला आहे. या तटात बनवलेल्या खोबणीत गणपतीची मुर्ती व शिवलिंग आहे. नदीच्या तटाबाजुच्या पत्रात उतरण्यासाठी पायर्या (घाट) बांधलेल्या आहेत.
तट पाहुन प्रवेशव्दारातून आत येउन मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर दोन झिजलेल्या वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजुला एक तुळशी वृंदावन असुन त्यात गणपतीची संगन्मरवरी मुर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक देवळी असुन त्यात देवीची मुर्ती आहे. नदीच्या पात्रातील खडकावरच कोटेश्वर मंदिर, बाजुने संथपणे वाहाणार कृष्णा नदीच पाणी आणि इथली शांतता हे सगळ एकदा जाउन अनुभवण्या सारख आहे.
नदीच्या पात्रातील खडकावरच कोटेश्वर मंदिर, बाजुने संथपणे वाहाणार कृष्णा नदीच पाणी आणि इथली शांतता हे सगळ एकदा जाउन अनुभवण्या सारख आहे.
आजुबाजूची पाहाण्यासारखी ठिकाण :- http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/bara-motanchi-vihir-limb-dist-satara_topic323.html" rel="nofollow - बारा मोटांची विहिर , http://trekshitiz.com/marathi/Sajjangad-Trek-S-Alpha.html" rel="nofollow - सज्जनगड , कास पठार.
सातार्याहुन सज्जनगड, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
शेरी लिंब गाव मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन २४० किमी अंतरावर लिंब गाव आहे. सातार्याच्या अलिकडचा टोल नाका ओलांडल्यावर (उजव्या बाजूला गौरीशंकर कॉलेजच्या इमारती दिसतात) पुढे साधारणपणे एक किमीवर नागेवाडीला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्यावरून २ किमी आत गेल्यावर उजव्या बाजूला जाणारा रस्ता बारा मोटांच्या विहिरीकडे जातो. तर डाव्या बाजूचा रस्ता कोटेश्वर मंदिराकडे जातो. या दोनही ठिकाणी वाहानाने जाता येते. त्यामुळे एका तासात दोनही ठिकाणे पाहाता येतात.
सातारा - शेरी लिंब अंतर १६ किमी आहे.
|