गावाचे नाव :- संगमेश्वर जिल्हा :- रत्नागिरी जवळचे मोठे गाव :- चिपळूण.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे प्राचीन गाव आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे प्राचीन घाटमार्ग या परीसरात उतरत होते. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी या भागात प्रचितगड, भवानीगड, महिमतगड हे किल्ले बांधण्यात आले.
चालुक्या़चा पुत्र कर्ण याची राजधानी कोल्हापूर येथे होती. त्याने इ.सनाच्या दुसर्या शतकात संगमेश्वर ही नगरी वसवली. या नगरीत शास्त्री, वरुणा आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमावर कर्णेश्वराचे मंदिर बांधले. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. मंदिर ४ फूट उंच जोत्यावर बांधलेले आहे. जोत्यावर फुलांची नक्षी काढलेली आहे. मंदिराचे गर्भगृह व प्रवेशमंडप असे दोन भाग असून प्रवेशमंडपाच्या बाहेरच्या भिंतीवर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस (प्रवेशमंडप सोडून) कोणतेही कोरीव काम केलेले नाही. मंदिराच्या गर्भगृहात छताखाली शंकराची पिंड आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे. मंदिर परीसरात एक वैशिष्ट्यपूर्ण "गध्देगाळ" पाहायला मिळतो. या "गध्देगाळावर वरच्या व खालच्या बाजूला देवनागरीत मजकूत लिहिलेला आहे.
जाण्यासाठी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) ने चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. शास्त्री पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळल्यास जो रस्ता सुरु होतो तेथून १ कि.मी. अंतरावर कसबा गाव लागते. तिथे "जनता सहकारी बँक" जवळ डावीकडे वळल्यास पुढे ३०० मीटर वर श्री कर्णेश्वर मंदिर आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) प्रचितगड २) भवानीगड . ३) महिमतगड ४) छ.संभाजी महाराज स्मारक ५) मार्लेश्वर सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Karneshwar Mandir , Village :- Sangmeshwar, Dist :- Ratnagiri , Nearest city :- Chiplun.
|