Print Page | Close Window

Dudhsagar Waterfall

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Monsoon Trekking
Forum Description: All about trekking in rains, best locations, safety measures, precautions.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=334
Printed Date: 27 Dec 2024 at 12:09am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Dudhsagar Waterfall
Posted By: Deepali Lanke
Subject: Dudhsagar Waterfall
Date Posted: 01 Aug 2015 at 5:17pm



                                    शुभ्रधवल दुधसागर -निसर्गाचा आविष्कार

                                                                                                    - दीपाली लंके

धबधबा या शब्दातच किती मतितार्थ दडलेला आहे याचा प्रत्यय आला तो शुभ्रधवल दुधसागर धबधबा पाहूनच. गोवा या राज्यात असलेला दुधसागर पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. निसर्गाचा आविष्कार म्हणजेच दुधसागर आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा धबधबा काही कारणास्तव पाहणे सद्य स्थितीत अडवळणिचे झाले आहे पोलिसांचा कडक पहारा आणि मॉन्सून मध्ये घडणारे अपघात या कारणास्तव मुळातच ट्रेकर्स साठी आकर्षक असा हा दुधसागर ट्रेक तसा सोपा राहिला नाहीये.

मुळातच जिथे जिद्द असते तिथे हा मार्ग निघतोच.दुधसागर ट्रेक हा आम्ही ६८ ट्रेकर्स नि केला आणि अक्षरश: हा ट्रेक आम्ही जगलो. दुधसागर चे वर्णन करावे तेवढे थोडे. शुभ्रधवल असा हा दुधसागर एका क्षणात डोळ्यात सामावून घ्यावा तर जमतच नाही. निसर्गाचा अविष्कार असलेला हा दुधसागर साधारणपणे १०३१ फूट उंचीचा आहे आणि याचा रौद्र अवतार तर विलोभनीय असून अंगावर रोमांच आणल्याशिवाय राहत नाही. फेसाळणाऱ्या पाण्याच्या धारा, डोंगराच्या कुशीतून एकमेकांशी स्पर्धा करत जमिनीला स्पर्श करतात.दुधसागर चा विस्तार फारच आकर्षक असून मनाला भुरळ पाडणारा आहे.उंचीवरून वाहणारा हा दुधसागर एका V आकाराच्या घळीतून खाली जमिनीला सोबत करतो. दुधसागर धबधब्याच्या मधल्या फळीत बदाम आकार झालेला जाणवतो. बदाम आकार किंवा हृदयाचा आकार ( दिल आकार )कातळाच्या घडणीतून अगदीच नैसर्गिकपणे झाल्याचे जाणवते. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या लाटा आणि त्यासमोर उभे राहून तो अनुभव घेणं म्हणजे सोने पे सुहागा च म्हणावा लागेल. ओलेचिंब करणार ते थंड पाणी, निसर्गाचा चमत्कार, थंड वारा आणि आजूबाजूला असणारी घनदाट गर्द झाडी मनाला उल्हसित करते, स्वर्गानुभास होतो. निसर्ग हाच माणसाचा मित्र, सोबती आणि सखा हे सारख मनात डोकावत जात. मनात असेच विचार येवून गेले :

रम्य होती पहाट

भिजलेली सगळी पाउलवाट

वारा होता सुसाट

तरी आनंद घेत होतो निसर्गाच्या सानिध्यात||

  

शुभ्र गडद होता दुधसागर

थांबलो एका क्षणाला

मग डोळे आमचे भिडले

डोंगरातून कोसळणाऱ्या त्या धबधब्याला ||

 

कठीण होती जंगलातील वाट

निसर्गाची आम्हाला मिळाली साथ

पावूस वाऱ्या संगे आनंदलो

बेभान झालो पाहुनी हि पाउलवाट ||

 

झाडा वेलीतून वाहत आलेले

उंच डोंगरावरून पाणी झरलेले

होते आमचे मन आसुसलेले

म्हणून दुधसागर डोळ्यात भरले ||

 

दुधसागर धबधब्याचा मनोरम्य देखावा

चालून एकदा तरी बघावा

स्वर्ग अनुभूतीचा खरा आनंद

जीवनात एकदा तरी घ्यावा ||

सूचना:

 

. सतत पोलिसांच्या कडक पहाऱ्यामूळे दुधसागर या रेल्वे स्थानकावर उतरता येत नाही. हजरत निझामुद्दीन - वास्को गोवा एक्सप्रेस हि रेल्वे पुण्याहून शनिवारी . २० वाजता सुटते. सकाळी साधारणपणे च्या जवळपास सोनालीयाम येथे उतरावे येथून दुधसागर धबधब्याला रेल्वे रुळावरून किलोमीटर चालत गेल्यास पोहचता येते. एकही नागमोडी वळण नाहीये.

 

. सकाळी च्या आत दुधसागर धबधब्याला पोहचल्यास धबधब्याचा आणि निसर्गाचा आनंद लुटू शकतो त्यानंतर पोलिसांचा कडक पहारा असतो.

 

. परतीचा मार्ग सोनालीयाम ते कुलेम असा करावा लागतो; हे अंतर एकंदरीत १२ किलोमीटर असून जेवण्याची आणि फ्रेश होण्याची सोय होते.

 

. जंगलातील वाट चुकण्याची शक्यता असते म्हणून जंगलात शिरू नये सरळ रस्त्यानेच चालत जावे.पावूस जास्त असल्याने पावसाळी पादत्राणे आणि रेनकोट सोबत बाळगावा. जळूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.दुधसागर धबधब्यात आणि डोहात पोहण्यासाठी उतरू नये खोली खूप जास्त असून पाण्यचा प्रवाह तीव्र आहे.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk