Print Page | Close Window

सुरगड एक सुंदर अनु

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Events
Forum Description: Mountaineering and Trekking related events, Photography Competition, Audio Video Competition.
Note :- Please do not add trekking events anywhere on this Discussion Board.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=283
Printed Date: 27 Dec 2024 at 2:42pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: सुरगड एक सुंदर अनु
Posted By: Ankita A
Subject: सुरगड एक सुंदर अनु
Date Posted: 18 Nov 2014 at 5:23pm
                                     सुरगड एक सुंदर अनुभव!!  
                                                                                   -अंकिता आंबेरकर

सुरगड फार प्रचलित नसला तरीही ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला.

माझा सुरागडाचा प्रवास शनिवार ८ नोव्हेंबरलाच सुरु झाला. ट्रेकचे वेळापत्रक सकाळचे असेल तर आम्हाला पुण्याहून आदल्या दिवशीच निघावे लागते. संध्याकाळी ६.३० वाजताची इंद्रायणी ट्रेन पकडण्याचे निश्चित करून मी आणि दीपाली मुंबईच्या दिशेने निघालो. रात्री राहायचे कुठे हा मोठा प्रश्न आमच्या दोघींसमोर होता मग एक मताने दोघींनी माझ्या बहिणीकडे ठाण्याला जायचे ठरवले. रात्री ११ च्या सुमारास तिकडे पोहोचलो आणि मग काय गप्पा मारण्यातच १ कधी वाजला कळलेच नाही. रात्री झोपण्यास उशीर झाल्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा मोठा प्रश्नच होता .३० ला शिवाजी पुतळ्याजवळ पोहोचण्याची leader ची strict instruction  होती त्यामुळे उगाचच कारण नको म्हणून  - mobile  मध्ये अलार्म लाऊन झोपलो.Finally सकाळी वाजता  रेल्वेचा तोटा करत (तिकीट काढण्यास फारच मोठी रंग असल्यामुळे  तिकीट   काढताच) डोंबिवलीच्या दिशेने रवाना झालो.ठरल्याप्रमाणे वेळेतच पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने ट्रेक ला सुरवात झाली.फारच कमी चेहरे ओळखीचे होते.सगळ्यांना hi , hello करत .१५ ला  सुरागडाच्या दिशेने बस निघाली. सुरागडावर वर मी दुसऱ्यांदा चालले होते त्यामुळे गडाबद्दल बरीचशी माहिती होती. सगळ्या मेम्बेर्स चे परिचय आणि लिडर च्या सूचना ऐकून सकाळी १०.०० च्या सुमारास गड चढण्यास सुरवात केली. मळलेली  पायवाट तुडवत, गप्पागोष्टी करत, नवख्या मेम्बेर्स ना cheer करत  पठारावर येउन पोहोचलो. पठारावरून पुढे गेल्यास डाव्या हाताला अन्साई देवीचे मंदिर असा फलक दिसतो.त्यादिशेने जाता सरळ चालत गेल्यास आपण घळी पाशी येऊ थांबतो.घळी चढण्या आधी उजव्या हातास भुयारी पाण्याचे टाक लागते. त्या भुयारी टाक्याचा दुसरा मार्ग गडावर जातो असे तेथील गावकऱ्यांचे  म्हणणे आहे. घळी पार करून पुढे गेल्यास उजव्या हाताला मारुतीचे मंदिर दिसते. मंदिरापासून उजव्या हाताने पुढे गेल्यास आपण बुरुजावर येउन पोहोचतो. बुरुजावरून कुंडलिका नदी आणि आजूबाजूचा फारच  सुंदर असा परिसर दृष्टीक्षेपात येतो. हे सर्व पाहतच पुढे मार्गक्रमण केले.पोट डब्बा काढा म्हणून सारखे खुणावत होते पण लिडरची सूचना आल्यशिवाय काही करू नाही शकत ना.....so आम्ही मार्गक्रमण करत राहिलो. नंतर लिडर आणि सर्वानुमते १जागा final  झाली आणि सर्वांनी variety of  food  चा आस्वाद घेतला. जेवणानंतर क्षितीज  च्या काही मेम्बर्स नि अप्रतिम माहिती सांगितली. महेंद्र दादाने सांगितलेल्या माहिती मुळे तर ज्ञानात  अधिकच भर पडली.साधारण संध्याकाळी च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली. गड उतरताना TD मुळे  tunnel Web spider  चे दर्शन घडले.वाटेत अन्साई देवीचे मंदिर लागले आणि तिथून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम अशी तोफ पाहायला मिळाली. -.३० च्या सुमारास group  फोटो काढून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.मधेच थांबून गरम गरम चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेऊन डोंबिवलीच्या दिशेने बस निघाली. बस मध्ये सर्वांचे feedback ऐकत,महेश दादाने दिलेले ice -creme  खात आणि गाण्याच्या मैफिलीमध्ये पनवेल कधी आले ते कळलेच नाही. मी आणि दीपाली(लिडर) पनवेल ला उतरलो आणि आमचा  पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सुरागडाच्या विविध आठवणीतच आम्ही दोघींनी  रात्री १२.३० च्या सुमारास पुणे गाठले.

विशेष आभार:-माझी(माझ्या बाग मधील चितळेंच्या भाकरवड्याची) विशेष काळजी घेतल्यामुळे सौशे आणि गौरव चे विशेष आभार.Thumbs Up




Replies:
Posted By: saurabhshetye
Date Posted: 18 Nov 2014 at 10:16pm
खूप छान !!
पण चार भाकरवड्या देऊन असा उद्धार करायचा हे बरं नाही....


Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 19 Nov 2014 at 4:23pm
ankita mast khup chhanSmile



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk