गावाचे नाव :- माचणूर जिल्हा :- सोलापूर जवळचे मोठे गाव :- पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे. माचणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून मंदिर संकुलात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शंकराचे छोटे मंदिर आहे. प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूट उंचीचा नंदी आहे. शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे. या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो.मंदिराच्या मागील बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे. नदीत एक पूरातन छोटे मंदिर आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) माचणूरचा किल्ला २) मंगळवेढ्याचा किल्ला ३) पंढरपूर माचणूरचा किल्ल्याची माहीती साईटवर दिलेली आहे.
जाण्यासाठी : माचणूर गाव सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Sidhheshwar Mandir , Village :- Machanur , Dist :- Solapur, Nearest city :- Pandharpur, Mangalvedha.
|