सप्टेंबर अखेर सह्याद्रीच्या पठारांवर, उतारंवर लाखो रानफुल फुलतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात.
गेल्या वर्षी ट्रेक क्षितिज संस्थेने पुरंदर किल्ल्यावर सप्टेंबर अखेर ट्रेक नेउन त्यावरील 84 जातीच्या फुलांची नोंद करुन सर्वांसाठी साइटवर उपलब्ध केलेली आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यातील "कास" म्हणुन ओळखल्या जाणार्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर ट्रेक क्षितिजने सप्टेंबर अखेर ट्रेक नेला होता. त्यावेळी ४४ प्रजातीच्या फुलांची नोंद आम्ही केली.
हि नोंद करण्यासाठी आमच्या बरोबर फ्लॉवर एक्सपर्ट म्हणुन ट्रेकला आलेल्या "विराज खोरजुवेकर "आणि ट्रेक क्षितिजच्या चिन्मय - प्रणोती खानोलकर या निसर्गप्रेमी दाम्पत्याचा मी आभारी आहे. तसेच फुलांची छायाचित्र घेउन पंकज राणे , अमोल नेरलेकर यानी मोलाची कामगिरी पार पाडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळील त्रिंगलवाडी या किल्ल्यावर सप्टेंबर -2014 रोजी नोंद केलेल्या रानफुलांची यादी खालील प्रमाणे आहे
.१. Striga gesnerioides :- बंबाखू
2. Impatiens pulcherrima :- ढाल तेरडा.
3. Sesamum orientale :- रानतीळ
4. Utricularia reticulata :-निळी पापणी
5. Lavandula bipinnata :- घोडेघुई
6. Smithia Purpurea :- बरका.
7 Pimpinella tomentosa :- रानजीर
8. Chlorophytom breviscapum :- फुलकाडी
9. commelina hasskarlii :- कमलीनी
10, commenlina forsskalaei :- कानपेट
11. Carviya callosa :- कारवी
12. Begonia creneta :- कापरु
13. Murdannia simplex :-निलिमा
14. Paracaryopsis coelestina :- निसुरडी
15. Asystasia violacea :- निळकंठ
16. Ipomoea nil :- निळी पुंगळी
17. Thalictrum dalzellii :- पांडा
18. Thespesia populnea :- परसभेंडी
19.Galactia tenuiflora :- लाल अबई
20. Momordica dioica :- करटोली.
21. Cassia auriculata :- तरवड
22. Plumbago zeylanica :- चित्रक
23. Triumfitta rhomboidea :- थिनझिरा
24. Besmodium laxiflorum :- आसुड
25. Solanum Xanthocarpum:-रानवांग (काटेरिंगणी)
26 Calotropis gigantea:- रुईच फुल
27 Vigna vexillata:- रानमुग जांभळा
28 Vigna Radiata:- रानमुग पिवळा (वेल मूंग)
29 I will check and confirm the name for this flower:- दिपज्योती
30 Persicaria glabra :- शेरल.
31 Smithia setulosa :-मोठा कवला
32. Linum mysurensu :- उंदरी
33. Trichodesma indicum :- छोटा कल्पा
34. Impatiens balsamina :- तेरडा
35 Impatiens lawii :- जांभळा तेरडा
36. Morning Glory :- शंखपुष्पी
37. :Acacia pennata :- शेंबरटी
38. Cosmos :-सोनकुसुम
39. Smithia sensitiva :- लाजाळू कवला
40. Smithia hirsuta :- कवला.
41. Celosia argentea :- कुर्डू , कोंबडा
42. Lantana camara :-घाणेरी , टणटणी.
४३ Begonia Crenata :- बेरकी
४४ Tridax procumbens :- एकदांडी