Print Page | Close Window

नीलकंठेश्वर -Neelkantheshwar

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Temples of Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Temples in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=182
Printed Date: 20 Nov 2024 at 8:32am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: नीलकंठेश्वर -Neelkantheshwar
Posted By: amitsamant
Subject: नीलकंठेश्वर -Neelkantheshwar
Date Posted: 04 Nov 2013 at 8:38pm
गावाचे नाव :- निलंगा
जिल्हा :- लातुर
जवळचे मोठे गाव :- उदगीर



लातूर - उदगिर रस्त्यावर लातूर पासून ६३ किमीवर निलंगा गाव आहे. या गावात भर वस्तीत निलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. मंदिराचे छत अस्तित्वात नाही. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुर सुंदरींच्या विविध प्रकारच्या मुर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिराला राखाडी रंगाच्या ऑईलपेंटने रंगवून दगडाचा नैसर्गिक काळा रंग झाकून टाकलेला आहे. 



आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  
१) निलंगा पासून ६३ किमीवर उदगिर किल्ला आहे. 
२) लातूर - उदगीर रस्त्यावर उदगीर पासून ७४ किमीवर (निलंगा पासून ११ किमी) खरोसा येथे प्राचीन हिंदू लेणी व एक पडकी गढी पहायला मिळते.
३) लातूर - उदगीर रस्त्यावर उदगीर पासून ९७ किमीवर (खरोसा पासून २३ किमी) औसा येथे किल्ला आहे.

 जाण्यासाठी :-
१) मुंबई, पुण्याहून उदगीरला / निलंगाला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. 
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने निलंगा गाठावे.

सूचना :- 
१) खाजगी वाहानाने उदगिर किल्ला, निलंगा, खरोसा लेणी व औसा किल्ला ही सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून लातूर येथे मुक्कामाला जाता येते.
२) उदगिर आणि औसा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.

Neelkantheshwar Mandir, Nilanga

Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
(Nilkantheshwar Temple :-  Village Nilanga, Dist :- Latur, Nearest city :- Udgir)




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk