दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ट्रेकक्षितीज संस्थेचा प्रयत्न असतो. या प्रयत्नातूनच नवनवीन संकल्पनांचा शोध लागतो आणि मग गड किल्ल्यांवर इतिहास शोधणारी पाऊले अवचित पक्षी फुले आणि फुलपाखरे यांचा वेध घेऊ लागतात. नुकताच झालेला भिगवण पक्षीनिरीक्षण उपक्रम हा याचे उत्तम उदाहरण आहे. झोंबणारी थंडी, निळेशार पाणी, त्यावर स्वच्छंद बागडणारे पाणपक्षी आणि येन तेन प्रकारेण त्यांचा मागोवा घेणारे आम्ही असे ह्या सोहळ्याचे स्वरूप होते.
भीमा नदीवर असणाऱ्या उजनी धरणामुळे तयार झालेल्या पाणवठ्यावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने पाणपक्षी निवाऱ्यासाठी येतात. सोलापूर महामार्गावर असणारे भिगवण हे छोटेसे गाव तिथे येणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर असणाऱ्या या गावी जाण्यासाठी ट्रेन आणि बस या दोन्ही मार्गांचा अवलंब करता येतो परंतु लांब लांब पसरलेल्या जागांमुळे आम्ही खाजगी वाहनाने जाणे पसंत केले.
डोंबिवलीहून शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी रात्री ११३० च्या सुमारास टीम निघाली. शनिवारी सकाळी ०५.३० ला आम्ही भिगवण मधील कुंभारवाडी या गावात पोहोचलो. कुंभारवाडी गावात श्री संदीप नगरे यांनी आमची चहा नाश्ता जेवण आणि राहण्याची सोय केली होती तसेच पक्षीनिरीक्षणासाठी लागणाऱ्या होड्यांची सोयही त्यांनी करून ठेवलेली. चहा नाश्ता आटोपून सुमारे ०८.३० च्या सुमारास आम्ही पक्षीनिरीक्षणाचा श्रीगणेशा केला.
भिगवण पक्षीनिरीक्षण उपक्रम हा प्रामुख्याने खालील प्रकारात विभागता येईल
कुंभारवाडी परिसर
डिकसळ परिसर
संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुंभारवाडी गावातील कच्च्या रस्त्याच्या अंगाने पाणवठ्याजवळ पोहोचलो. तिथून पुढे होडीने पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत जाताना आम्हाला अनेक पक्षी बघावयास मिळाले. हे निरनिराळे पक्षी बघताना अर्थात संदीप यांचे मार्गदर्शन होतेच. संदीप हे स्वतः पक्षीनिरीक्षण चे अभ्यासक आहेत. अनेक लेखकांची पुस्तके अभ्यासून आता त्यांनी स्वतः पुस्तक लिहिण्याचे कार्य हाती घेतले आहे. ह्या सकाळच्या सत्रात आम्हाला पुढील प्रमाणे पक्षी बघावयास मिळाले
Black winged stilt
Brown headed seagull
Grey Heron
Open billed stork
Painted Stork
Flemingo
Green beaeater
Hoopooe
Ashy Drongo
Cormorant
Lark Northen shoveler (Male & Female)Yellow WogtailSpoon billed storkWhiskered TernRiver ternRound headed gullLongtail shrikeSandpiperRed Avadawat (Formerly known as Red munia)White Throated kingfisherPurple sunbirdPurple rumped sunbirdLittle egretLarge egretBar headed gooseBlack ibisWhite ibisGlossy ibisChakrawatRed vented bulbulGodwitसाधारण १२.३० च्या सुमारास म्हणजे तब्बल ४ तासांच्या अथक श्रमानंतर आम्हाला भुकेची जाणीव होऊ लागली आणि मग पोटपुजेसाठी आम्ही संदीप यांच्या घरी प्रस्थान केले. गरम गरम गावरान जेवण आणि घटकाभर वामकुक्षी झाल्यावर साधारण ४ च्या सुमारास आम्ही पुन्हा पक्षीनिरीक्षणासाठी कंबर कसली. परंतु या दुसर्यादुसऱ्या सत्रात पुन्हा होडीने प्रवास न करता आम्ही चालतच किनारा आणि त्या आजूबाजूला पसरलेली शेतवाडी पिंजून काढायचे ठरवले. जेणेकरून जे पक्षी पाण्यान स्वैर न करता किनाऱ्याची शोभा वाढवतात त्यांच्यावरही नेत्रसुख घेता येईल. संधीप्रकाशात आणखीनच उजळू पाहणारा तीर त्यात आपली रुपडी पाहणारे पक्षी आणि कातरवेळी घराची ओढ लागलेले पक्ष्यांचे थवे पाहून आम्ही थक्क झालो. या दुसऱ्या सत्रात पुढील पक्षी आम्हास पहावयास मिळाले
Pond Heron
Common coot
Jungle myna
Common stonechat
दिवेलागणी च्या सुमारास आम्ही संदीप नगरे यांच्या घरी परतलो. प्रात्याक्षिकाला जोड मिळावी म्हणून ट्रेकक्षितीज संस्थेतर्फे प्रणोती खानोलकर यांनी आम्हाला स्लाईड शो दाखवला ज्यात सर्व तांत्रिक गोष्टींचा समावेश होता. पक्षी म्हणजे काय त्यांचे अवयव वैशिष्ट्ये काय इथ पासून ते पक्षी कसे ओळखावेत ह्या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास या स्लाईड शो मधून करावयास मिळाला. अशाप्रकारे हा भिगवण पक्षीनिरीक्षणाचा पहिला टप्पा पार पडून आणि पुढील दिवशीचे आकर्षण असणाऱ्या मयुरेश्वर प्राणी अभयारण्याचे स्वप्न उशाशी घेऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
|