सातमाळेतील तीन मणी—अचला,अहिवंत
आणि मोहंदर...
नेहमीप्रमाणे
यावेळीसुद्धा समस्या उभी होतीच.दिवाळीत गाडीवरून पडलो होतो आणि अजून नीट बरा झालोच
नव्हतो.पण मनाशी पक्कं केलं आणि नाशिकला निघालो.शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या
सुमारास द्वारका circle ला पोचलो.ट्रेकक्षीतीझची team डोंबिवली वरून २.३० वाजता मला भेटली,पुण्यातून
प्रथमेश पण आला होताच आणि द्वाराकेतूनच श्रीकृष्णदादाला घेतला.अशाप्रकारे सातमाळ
च्या दिशेने प्रवास चालू झाला.
Sack, sleeping
bag, pittu bag
,track pant सगळ्याचे
एकदमच उद्घाटन केले होते.पहाटे ५.३० पर्यंत पिंप्री वाडा मध्ये दाखल
झालो.आवरून,नाश्ता करून ओळख परेड झाली आणि ७.१५ वाजता अचला चढण्यास सुरुवात केली.सुरुवातीची
वहिवाट द्राक्षाच्या बागेतून,वन विभागाने लावलेल्या जंगलातून जात होती.पुढचा टप्पा
जरा कठीणच गेला..वाटेचा अंदाज आला नाही,रस्ता थोडासा चुकला.सर्वेश आणि सुनीलने याआधी
हा किल्ला केला होता पण तेही थोडे गोंधळले.पण सरतेशेवटी पायऱ्या दृष्टीक्षेपात
आल्या आणि हायसं वाटलं.
किल्ल्यावर एक
वैशिष्ट्यपूर्ण पाण्याचे टाके आढळले.स्थानिक लोक आजार बरा झाल्यावर त्या टाक्यात
अंघोळ करून नवीन कपडे घालून गड उतरतात.त्यामुळे टाक्याजवळ जुन्या कपड्यांचा ढीग
पडला होता.अजून काही टाकी होती,त्यांची रचना सुद्धा सुंदर आहे.overflow
system प्रमाणे
एकाखाली एक अशी त्यांची बांधणी आहे.तसे बाकी काही अवशेष गडावर दिसून येत
नाहीत.गडाचा वापर टेहेळणी साठीच केला जात असावा.पायऱ्यांच्या वर एक खोदलेले
खिडकीवजा भुयार आहे,तेसुद्धा पाहण्यासारखं आहे.त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे.
अचला उतरून दगड पिंप्री
मध्ये आलो.सुतार पक्षाचे दर्शन झाले.लगेच तिथून अहिवंतच्या दिशेने निघालो.गावातून
बाहेर पडताना ५ वीरगळी मांडून ठेवल्या आहेत,त्या छान आहेत.सगळ्यांना डुलका लागला
आणि इतक्यात दरेगावला पोचलो सुद्धा.उन्हाचा कडक जाणवत होता.pittu bag मध्ये जेवणाचे
डबे,पाणी घेतलं आणि चढाई चालू केली...,किल्ले अहिवंत.
सरळ उभी चढण होती,सोबत
वाटाड्या होताच.काही वेळातच खिंडीत पोचलो.तिथून दिसणारा नजारा औरच होता.सप्तशृंगी
चा खडा पहाड,मार्तंडया,रावळया-जावळया मागे धोडप. सुंदर .तिथेच बसून जेवण
केलं.डूब्यावर पाच पाण्याची टाकी आणि तटबंदीचे काही अवशेष महेंद्र दादा ने MAP केले.किल्ल्यावर
जुन्या वस्तूंचे अवशेष बरेच पडले होते.अहिवंत चा पसारा प्रचंड आहे.पाण्याची
टाकी,मोठा तलाव,छोटेसे मंदिर पाहायला मिळाले.गडाच्या पश्चिम बाजूला एक मोठी गुहा
आहे,ती पाहून तिथेच अमित दादा ने गडाचा इतिहास सांगितला.मुंगळयाचे महाभारत खूप
दिवसांनी ऐकले.महेंद्र दादा सोबत नंतर उंच टेकडीवर जाऊन mapping करून आलो,तिथे दोन राजवाड्यांचे आणि एक पाण्याचे
टाके (बुजलेले) याचे अवशेष पाहायला मिळाले.
शेवटी राजमार्गाने गड
उतरताना अहिवंत ची भव्यता जाणवत होती.ट्रेक लीडर निमिशा मुळे वेळेत खाली
उतरलो.सोबत विशाल आणि तानाजी हि शाळकरी मुले होतीच,त्यांची मदत झालीच.सगळे प्रचंड
पायपीट केल्याने कंटाळले होते,चहा झाला.महेंद्र दादा सोबत त्याचे दुर्गभ्रमंती हे
पुस्तक,तसेच त्याचे अनुभव यावर चर्चा झाली,खूप नवीन गोष्टी समोर आल्या.जेवणातील
लीना ताईने आणलेल्या गाजर हलव्याने मजा आली.त्यामुळेच सगळे न घोरता झोपू शकले!!!!
रविवारी,२९ तारखेला सकाळी
५.३० वाजताच WAKE UP CALL मिळाला.रात्री छान पैकी पाऊस झाला होता..प्रथमेश
ने रात्री कधी सगळ्याचे बूट आत आणून ठेवले समजलेच नाही.मंदिर बंदिस्त असल्याने
पावसाचा त्रास झाला नाही.नाश्ता करून किल्ले मोहंदर कडे प्रस्थान केले.
किल्ल्याचे वैशिट्य
म्हणजे त्याचे नेढे.तिथे मधमाश्यांची पोळी होती,खबरदारी म्हणून आम्ही सगळे अंग
झाकून घेतलं.आमच्यासोबत मयुरेश जोशी येणार होते.त्यांनी नेढ्याची दंतकथा
सांगितली.नेढे म्हणजे डोंगराला पडलेले सुईसारखे भोक.देवीने दैत्याला मारले आणि
त्याचा प्राण इतका जोराने बाहेर पडला कि डोंगराला छिद्र पडले.असो.
नेढ्यापर्यंतचा मार्ग
घसरडाच होता.ROPE लावून नेढे CLIMB केले.दुसऱ्या एका ग्रुप ची पण मदत झाली.काही
जणांना अवघड गेलं पण होईल सवय त्यानाही.पलिकडे गेल्यावर खूप मस्त वाटत होतं..असा
अनुभव प्रथमच घेतला.समोर अबोना गाव आणि चणकापूर धरण अप्रतिम दिसत होतं.डोंगराच्या
कडेच्या रस्त्याने गडावर पोचलो.पाण्याची टाकी,वरून दिसणारा सह्याद्री,कण्हेर गड
पाहून मोहंदर उतरण्यास सुरुवात केली.
परंतु वाट चुकीची
निवडल्याने उतरण्यास कठीण गेले.वाटाड्या घ्यायला हवा होतं असा वाटलं.अवघड वाट
होती,पण अशातूनच माणूस शिकतो,अनुभवी बनतो.चुका सुधारतो.लीडर ने ग्रुप छान
सांभाळला.खाली आल्यावर मन आनंदानं भरून गेलं होतं.वेगळा ट्रेक केल्याचं समाधान
मिळालं होतं.FEEDBACK मधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या.साठ वर्षाचे तरुण सुनील काका,त्यांनी
तर कमाल केली.बोलताना सुद्धा सांगितलेले काही मुद्दे मनाला भिडले.महाराजांनी जे
उभं केलंय,ते पहा तरी.चालते व्हा,ट्रेक करत राहा.
सातमाळेतील तीन मणी
पहिले.अहिवंत खूप आवडला.पंकज घारे सारखा लेखक भेटला,अबोनातील मित्राची ओळख
झाली.अनेक नवीन सवंगडी मिळाले.दालतडका आणि ताकावर ताव मारून परतीचा प्रवास सुरु
केला तो राहिलेल्या माळेकडे पहातच..रावळया,जावळया,मार्तंडया आणि वणी!!!!.
|