Print Page | Close Window

Tree plantation trek at Sudhagad

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: Updates from TreKshitiZ
Forum Description: Upcoming events from TreKshitiZ would be posted in this section
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=150
Printed Date: 17 May 2024 at 6:06am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Tree plantation trek at Sudhagad
Posted By: amitsamant
Subject: Tree plantation trek at Sudhagad
Date Posted: 13 Jun 2013 at 7:46pm
गडावर झाडे जी असतील ती राखावी. याविरहीत जी जी झाडे आहेत ती आंबे, फणस, चिंचा ,वड पिंपळ आदिकरून थोर वृक्ष निंबे ,नारींगे आदिकरून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे.  --- आज्ञापत्र

     सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणार्‍या "सवाष्णीच्या घाटाचा" पहारेकरी. या प्राचीन किल्ल्याच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. एकेकाळी झाडांनी आच्छादलेला गडमाथा आज मात्र उजाड झालेला आहे. गडसंवर्धनाची इतर कामे करतांना ही गोष्ट "ट्रेक क्षितिजियन्सच्या" प्रकर्षाने जाणवली. त्यातूनच गडावर वृक्षारोपण करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला गडावर ट्रेक नेण्यास सुरुवात झाली. गेली १२ वर्षे आलेल्या अनेक अनुभवातून आम्ही शिकत गेलो असे म्हणण्यापेक्षा निसर्गानेच आम्हाला अनेक धडे दिले.

घराच्या बाल्कनीतल्या कुंडीत किंवा घराच्या परीसरात झाडे लावणे आणि घरापासून १५० किलोमिटरवर झाडे लाऊन ती वाढवणे यातील अडचणी आमच्या ध्यान्यात यायला लागल्या. त्यातून लावलेल्या झाडांची जोपासना करण्यासाठी डिसेंबरमध्ये सुधागड किल्ल्यावर ट्रेक नेण्यास सुरुवात झाली. उन्हाळ्यात लागणारे वणवे, गडावरील मोकाट गुरे, पाण्याची कमतरता इत्यादी अडचणींना तोंड देत आम्ही आजपर्यंत ६० झाडे जगविण्यात यशस्वी झालो.

यावर्षी सुध्दा वृक्षारोपण करण्यासाठी ट्रेक क्षितिज संस्थेने दिनांक २२ व २३ जून २०१३ रोजी सुधागड किल्ल्यावर ट्रेकचे आयोजन केलेले आहे. या ट्रेकमध्ये पहील्या दिवशी सकाळी किल्ल्यावरील पठारावर ३० रोपटी लावण्याची ,तसेच दुसर्‍या दिवशी गड पाहून परत येण्याची योजना आहे. या ट्रेकचे नोदंणी शुल्क रुपये ६००/- आहे. अधिक माहितीसाठी :- वैभव पालांडे - ९८३३९१२००१ & www.trekshitiz.com
 




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk