Print Page | Close Window

शतकांच्या यज्ञातु

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=262
Printed Date: 20 Apr 2024 at 7:26pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: शतकांच्या यज्ञातु
Posted By: saurabhshetye
Subject: शतकांच्या यज्ञातु
Date Posted: 24 Sep 2014 at 6:15am

शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्‍तियुक्‍तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज!

'शिवछत्रपतींचा जय हो!'
'श्रीजगदंबेचा जय हो!'
'या भरतभूमिचा जय हो!'
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला.

 

- शंकर वैद्य 




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk