Print Page | Close Window

रायगडवारी

Printed From: TreKshitiZ
Category: Nature
Forum Name: Flora and Fauna In Sahyadri
Forum Description: Information regarding medicinal herbs,details regarding flowers,useful trees can be shared in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=325
Printed Date: 28 Mar 2024 at 9:35pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: रायगडवारी
Posted By: Deepali Lanke
Subject: रायगडवारी
Date Posted: 27 Apr 2015 at 4:31pm
                                                    रायगडवारी

                                                                   - दीपाली लंके

 

रायरी उर्फ रायगड हिंदवी साम्राज्याची राजधानी गिरिदुर्ग असून साधारणपणे २९०० फूट उंचीवर आहे. आणि आपले भक्कम स्थान आणि वास्तू वैभव जपून आहे. रायगडवारी प्रत्येक भटक्याच एक स्वप्न असतं. सह्याद्री जिथून घडवली गेली ज्या नेतृत्वाच्या आधारे उभी झाली हिंदवी साम्राज्याचा विस्तार जिथून झाला  अशा पावनभूमी ला पदस्पर्श व्हावे हि मनात इच्छा बाळगणारे बरेच असतात त्यातलीच मी. सह्याद्रीत भटकत असताना बर्याच किल्ल्यांना भेट देता आली पण गेली वर्षापासून उरात बाळगलेल रायगडवारी स्वप्न मात्र सारख्या हुलकावण्या देत होतं. रायगडवारीचा योग काही केल्या जुळून येत नव्हता मनात त्याचच खूप शल्य वाटत होतं. रायगडवारी कधी होईल असं झालं होतं, मन अधीर झालं होतं. मनातल्या सुप्त इच्छा आपण उराशी बाळगलेली स्वप्न हि खरी असतील तर ती नक्कीच पूर्णत्वास जातात आणि त्याचच प्रत्यंतर मी रायगड वारी केली ती या १९ एप्रिल २०१५ रोजी अगदी शिवजयंती च्या दिवशीच, मनाला खूप समाधान लाभले.

 

रायगड हिंदवी साम्राज्याचा निर्माता, रक्षणकर्ता आणि आधारस्तंभ याचे रायगडाने अनेक सुखद आणि दुखद प्रसंग अनुभवले. रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्यांची गोह्द्दौड , अनेक महत्वपूर्ण लढाया आणि कमी वयातील निधन या सगळ्याच घटनेचा साक्षीदार ठरला. रायगडा वर चित दरवाज्याने प्रवेश केला. सकाळच्या वेळी सुद्धा टकमक टोक जणू त्याचा भीषण रूप दाखवत मनात धडकी भरत होता.१५०० पेक्षा सुद्धा जास्त पायऱ्यांची आरास पुढ्यात ठेवली होती जस जसा गड सर करत होते मनाला विलक्षण समाधान मिळत होते शिवरायांचा इतिहास आणि घडलेल्या घडामोडी डोळ्यसमोर घर करू लागल्या होत्या खुबलढा बुरुज, नाना दरवाजा मागे पडत होते प्रसन्न सकाळ आणि शिवरायांचा जयघोष दर्या खोर्यातून निनादात होता,असा जणू भासच होत होता. रायगड किती दुर्गम डोंगरावर उभा केला आहे त्याचा अनुभव आपल्याला प्रत्येक पवालोगानिक येतो. सभोवतालच जंगल , सुळके आणि दऱ्या खोऱ्या आपल्याला त्यांच्या विलक्षण सौंदर्याने अगदी मंत्र मुग्ध करतात.

रायगडाची ओढ एवढी लागली होती कि अगदी अर्ध्या तासात पायऱ्या सर केल्या आणि स्वतावरच विशास बसत नव्हता एवढ्या लवकर महादरवाजा आपल्याला जवळ करील आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल. महादरवाजा त्याचं स्थान जपून होतं. गडावर प्रवेश होताच नजर चौफेर उधळली आणि नजरेत रायगड समाविष्ट करण्याचा मी प्रयत्न करू लागले. रायगड त्याचा भक्कम इतिहास आणि भग्न असलेलं वास्तू वैभव पाहून मी मोहित झाले. टकमक टोक गडाचा निमुळता भाग आणि कडेलोट केंद्र म्हणून प्रचलित असलं तरी आपल्या नजरेतून त्यांच सौन्दर्य आणि तिथून दिसणारी दरी मनात धडकी भरवते. मध्ये लागलेलं पाण्याचे टाके आणि पुढे बाजार पेठेच विहंगम दृश्य तसेच तिथूनच दिसणारा शिवाजी महाराजांचा राजवाडा त्यांचं सिंहासन,नगारखाना, कुशवर्त तलाव आणि वाघ दरवाजा, हिरकणी बुरुज, राणी महाल, मेणा दरवाजा, धन्य कोठार, तसेच अष्ट प्रधान यांच्या घरांचे अवशेष पहिले. शिवाजी महाराजाच्या सिंहासना जवळ जावून माथा टेकवला आणि मी धन्य झाले. मनात आभार मानले त्यांच्या मूळे आज हिंदवी साम्राज्य आणि आपण अबाधित राहिलो.बर्याच गोष्टी ज्या इतिहासात घडल्या होत्या त्या डोळ्यांसमोरून जात होत्या.शिरकाई देवीचं देवूळ पाहिलं आणि जगदीश्वर मंदिराकडे जावूया म्हणून ओढ लागली. तिथे जाताना गती संथ झाली होती आपल्या आराध्य दैवताची समाधी त्याच तर ठिकाणी होती.मनात मळभ दाटून आले जरी घटना घडून गेल्या असल्या तरी इतिहास आणि वास्तू या इतिहासाच्या मूक साक्षीदार असतात.जगदीश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि महाराजांच्या समाधी कडे प्रयाण केले. आणि कळतच डोळ्यात आदरयुक्त संमिश्र भावना आणि अश्रू उभे राहिले. महाराजांचे सत्य आचरण, देशसेवा आणि त्यांचा अद्वितीयातीत असा पराक्रम उराशी साठवत तिथून साश्रू नयनांनी माघारी फिरले ते चांगल्या प्रेरणेने.

 

उराशी बाळगलेल रायगड वारी स्वप्न सत्यात उतरलं खंर पण पावनभूमीत जावून तिथून परतावेसे असे वाटत नव्हते. उगीचच वाटले हे वास्तू वैभव इतिहासाचा मूक साक्षीदार, आपल्याला काही सांगेल का कि शिवचरित्र कसं घडलं होतं ते.प्रत्येक भिंतीला हात लावून मन अगदी हलक झालं होतं.आणि परतीला तर रायगड वारी पुन्हा पुन्हा लाभो हीच इच्छा मनात ठेवून सफळ संपूर्ण झाली.






Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk