Print Page | Close Window

जंबिया

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=33
Printed Date: 22 Dec 2024 at 1:11pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: जंबिया
Posted By: amitsamant
Subject: जंबिया
Date Posted: 16 Jun 2012 at 8:14pm

Jambia, Ancient & Medieval weapon;     


हे मुस्लीम पध्दतीचे लहान शस्त्र आहे. याचे पाते दुधारी, निमुळते, टोकदार असते. पात्याच्या मधोमध शीर असते. शिंग पाते विशिष्ट कोनात वळवलेले असते. जंबियाची मूठ शिंग, लाकुड  व हस्तीदंत यापासून बनविलेली असते. मुठीवर पकड घट्ट रहावी म्हणून मूठ टोकाकडे रुंद केलेली असते किंवा मूठ दोन्ही बाजूला रुंद करुन त्याला डमरूचा आकार दिलेला असतो. पात्याच्या आकाराचे म्यान जंबियाला असते. जंबियाचे म्यान चांदी, रत्ने आणि चामडे यांनी सजविले जाते. जंबिया शेल्यात खोचला जात असे किंवा पट्ट्याला अडकविला जात असे.यमेन देशामध्ये पुरूषाने १४ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जंबिया हा त्याचा रोजच्या वस्त्रप्रावरणाचा एक अनिवार्य भाग बनतो. गेंड्याच्या शिंगापासून बनविलेल्या हा सैफानी मूठीचा जंबिया, मानाचे प्रतिक समजले जाते.जंबियाचा उपयोग मुख्यत्वे शोभेसाठी असला तरी तंट्याच्या वेळी मात्र ते म्यानातून बाहेर निघू शकते.

Jambia, Ancient & Medieval weapon;Jambia, Ancient & Medieval weapon;Jambia, Ancient & Medieval weapon;Jambia, Ancient & Medieval weapon;




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk