Print Page | Close Window

शिवोत्सव २०१९

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: TreKshitiZ Events
Forum Description: Registrations and Details for TreKshitiZ events would be in this forum
URL: http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/forum_posts.asp?TID=373
Printed Date: 16 Jul 2019 at 9:54pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: शिवोत्सव २०१९
Posted By: harshalmahajan
Subject: शिवोत्सव २०१९
Date Posted: 20 Jan 2019 at 11:43am
शिवोत्सव २०१९ : व्याख्यानमाला - १ ते ३ फेब्रूवारी २०१९

-------------
See ya in the Hills of Sahyadri !!Replies:
Posted By: harshalmahajan
Date Posted: 20 Jan 2019 at 12:46pm


-------------
See ya in the Hills of Sahyadri !!


Posted By: harshalmahajan
Date Posted: 28 Jan 2019 at 9:59am


-------------
See ya in the Hills of Sahyadri !!


Posted By: harshalmahajan
Date Posted: 28 Jan 2019 at 10:04am
🏻 *आग्रहाचे आमंत्रण* 🏻

*ट्रेकक्षितीज संस्था*, दुर्गभ्रमणाचे आणि दुर्ग-संवर्धनाचे ध्येय समोर ठेऊन दुर्गभ्रमंती, वेबसाईट, स्लाईड शो, सुधागड प्रकल्प, किल्ले बांधणी स्पर्धा, शिवोत्सव, इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून गेली १९ वर्षे वाटचाल करत आहे.
*शिवोत्सव २०१९* मध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश असेल :

आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या मध्ययुगीन वास्तूंचे प्रदर्शन *इतिहासाचे साक्षीदार* या थीम द्वारे संस्था मांडणार आहे. ह्या मध्ये *_मध्ययुगीन शस्त्रास्त्रे ⚔, शिवकालीन नाणी, तोफ-गोळे_* व *_मोडी-लिपीतील कागदपत्रे 📜_* यांचा खजिना सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.

आपल्या संस्कृति व इतिहासा बद्दल अभ्यासपूर्ण माहिती तज्ञ व्यक्तिमत्त्वांकडून समजण्यासाठी ह्या वर्षी *व्याख्यानमाला* चे आयोजन केले आहे.

शुक्रवार १ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा
विषय: *महाराष्ट्रातील मंदिरे*
वक्ते: *_डॉ. श्री. गोरक्षनाथ देगलूरकर_*

शनिवार २ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा
विषय: *महाराष्ट्रातील लेणी*
वक्ते: *_श्री. विनायक परब_*

रविवार ३ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा
विषय: *प्राचीन विज्ञान*
वक्ते: *_डॉ. श्री. सच्चिदानन्द शेवडे_*

किल्ल्यांच्या नकाशाचे पहिले इंग्रजी पुस्तक *FORTS through MAPS* चे प्रकाशन या शिवोत्सव कार्यक्रमात आपण करणार आहोत. ह्या पुस्तका मध्ये १५० किल्ल्यांचे तपशीलवार नकाशे *_श्री. महेंद्र गोवेकर_* यांनी काढले असून माहिती संकलन *_श्री. श्रीकृष्ण जोशी_* यांनी केली आहे. नवीन लेखकांना नेहमीच प्रोत्साहनाचा हात देणारे *_श्री. रवींद्र घाटपांडे_* ह्यांच्या स्नेहल प्रकाशन पुणे येथे पुस्तकाचे मुद्रण केले गेले आहे.

ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ *_डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर_* व एवरेस्टवीर *_श्री. उमेश झिरपे_* यांच्या हस्ते शुक्रवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता ह्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

तारीख: *१-२-३ फेब्रुवारी २०१९*
(शुक्रवार - शनिवार - रविवार)
वेळ: *सकाळी ९:०० ते रात्री ९:००*
ठिकाण: *श्री. गणेश मंदिर संस्थान*,
विनायक व वक्रतुंड सभागृह, २ व ३
मजला, फडके पथ, डोंबिवली (पुर्व).

तरी आपण सर्वांनी सहपरिवार या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती, धन्यवाद... 🙏🏻

संपर्क:
*_अमित दीक्षित_* व *_ऋषीकेश मोटे_*
9930755513 / 8108665040


-------------
See ya in the Hills of Sahyadri !!Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk