🏻 *आग्रहाचे आमंत्रण* 🏻
*ट्रेकक्षितीज संस्था*, दुर्गभ्रमणाचे आणि दुर्ग-संवर्धनाचे ध्येय समोर ठेऊन दुर्गभ्रमंती, वेबसाईट, स्लाईड शो, सुधागड प्रकल्प, किल्ले बांधणी स्पर्धा, शिवोत्सव, इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून गेली १९ वर्षे वाटचाल करत आहे. *शिवोत्सव २०१९* मध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश असेल :
आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या मध्ययुगीन वास्तूंचे प्रदर्शन *इतिहासाचे साक्षीदार* या थीम द्वारे संस्था मांडणार आहे. ह्या मध्ये *_मध्ययुगीन शस्त्रास्त्रे ⚔, शिवकालीन नाणी, तोफ-गोळे_* व *_मोडी-लिपीतील कागदपत्रे _* यांचा खजिना सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.
आपल्या संस्कृति व इतिहासा बद्दल अभ्यासपूर्ण माहिती तज्ञ व्यक्तिमत्त्वांकडून समजण्यासाठी ह्या वर्षी *व्याख्यानमाला* चे आयोजन केले आहे.
शुक्रवार १ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा विषय: *महाराष्ट्रातील मंदिरे* वक्ते: *_डॉ. श्री. गोरक्षनाथ देगलूरकर_*
शनिवार २ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा विषय: *महाराष्ट्रातील लेणी* वक्ते: *_श्री. विनायक परब_*
रविवार ३ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ७ वा विषय: *प्राचीन विज्ञान* वक्ते: *_डॉ. श्री. सच्चिदानन्द शेवडे_*
किल्ल्यांच्या नकाशाचे पहिले इंग्रजी पुस्तक *FORTS through MAPS* चे प्रकाशन या शिवोत्सव कार्यक्रमात आपण करणार आहोत. ह्या पुस्तका मध्ये १५० किल्ल्यांचे तपशीलवार नकाशे *_श्री. महेंद्र गोवेकर_* यांनी काढले असून माहिती संकलन *_श्री. श्रीकृष्ण जोशी_* यांनी केली आहे. नवीन लेखकांना नेहमीच प्रोत्साहनाचा हात देणारे *_श्री. रवींद्र घाटपांडे_* ह्यांच्या स्नेहल प्रकाशन पुणे येथे पुस्तकाचे मुद्रण केले गेले आहे.
ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ *_डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर_* व एवरेस्टवीर *_श्री. उमेश झिरपे_* यांच्या हस्ते शुक्रवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता ह्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
तारीख: *१-२-३ फेब्रुवारी २०१९* (शुक्रवार - शनिवार - रविवार) वेळ: *सकाळी ९:०० ते रात्री ९:००* ठिकाण: *श्री. गणेश मंदिर संस्थान*, विनायक व वक्रतुंड सभागृह, २ व ३ मजला, फडके पथ, डोंबिवली (पुर्व).
तरी आपण सर्वांनी सहपरिवार या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती, धन्यवाद... 🏻
संपर्क: *_अमित दीक्षित_* व *_ऋषीकेश मोटे_* 9930755513 / 8108665040
------------- See ya in the Hills of Sahyadri !!
|