कबूतर (Rock Dove) |
Post Reply |
Author | |
AARTI
Senior Member Joined: 30 Apr 2014 Location: PUNE Status: Offline Points: 105 |
Post Options
Thanks(0)
Posted: 27 Feb 2015 at 11:39am |
Thanks Amitda! |
|
Sponsored Links | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
|
मस्त
|
|
AARTI
Senior Member Joined: 30 Apr 2014 Location: PUNE Status: Offline Points: 105 |
Post Options
Thanks(0)
|
कबूतर (Rock Dove)शास्त्रीय नाव (Columba livia) कोलंबा लिवियाअसून ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिविया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. आपल्या रोजच्या पाहण्यात येणारा,भिंतींच्या कपारी, झुन्या पडीक इमारती, ओसाड घरे, पडक्या विहिरी मंदिरे, चर्च, सरकारी इमारती, रेल्वे स्टेशन, शाळा इ. मध्ये वर्षानुवर्षे हक्काचे स्थान ठोकून असलेला, मठ्ठ, हावरट, अतिशय आळशी जीवन जगणारा,नावडणारापक्षी म्हणजे कबूतर. दगडी पाटीसारखा राखट रंगाचा, गळ्यावर आणि छातीवर हिरवी जांभळट झाक, डोळे आणि पाय लाल रंगाचे, पंखांवर दोन आडवे पट्टे, आणि शेपटीच्या टोकावर एक आडवा काळा पट्टा, साधारणतः 32 सें. मी. आकारमानाचा असून नर-मादी दिसायला सारखेच असतात. 1.Rock Dove राजे महाराजांच्या काळापासून दुसर्यामहायुद्धा पर्यंत संदेश वहनाच काम कबूतरच करायची. त्याकाळी परस्परांच्या आप्तांना काही संदेश पाठवायचा झाल्यास कबूतराच्या पायाला चिट्ठी बांधून संदेश पाठवला जायचा. कबूतराची स्मरणशक्ती खूप चांगली असते त्यामुळे संदेश वहनाचे काम कबूतरे चोख करत असत. इ. स. 1150 मध्ये बगदादच्या सुलतानाने कबुतरांची डाक सेवा चालू केली, आणि हि सेवा इ.स. 1258 पर्यंत कार्यरत होती, पहिल्या महायुद्धात सुद्धा कबुतरांचा उपयोग संदेशवहनासाठी करण्यात आला होता. दुसर्या जागतिक महायुद्धात जवळपास 32 कबूतरांना 1943 साली स्थापन केलेले डिकिन पदक त्यांच्या शौर्य सेवे साठी प्रदान करण्यात आले. ह्या महायुद्धात शत्रू सैन्यांच्या सीमा रेषेवर असणार्या अमेरिकन प्रतिनिधीना गुप्त संदेश पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. मूळ स्थानी परत येण्याच्या कबूतरांच्या सहज प्रवृत्ती बरोबरच कबूतरांच्या काही जातीं मध्ये भरारी घेताना कसरती करण्याची प्रवृत्ती असते. हेलकावे घेणे, उडतासताना मधेच उलटे होणे, कवायती करणे इ. हि प्रवृत्ती पाळीव कबूतरां मध्ये जास्त प्रमाणात आढळते. बरेचजण छंद, आवड जोपासण्यासाठी कबुतरांचे पालन करतात. तसेच बर्याचदा कबुतरांची स्पर्धा हा छंद जोपासण्यासाठी कबूतरे पाळतात. कबुतरांच्या स्पर्धेत त्यावर पैसा पण लावला जातो. कबूतर पाळणे हे फार खर्चाचे काम आहे, त्यासाठी ऐसपैस कबुतरखाने बांधणे, बगीचे बांधणे, दैनिक खाद्य, पशु वैद्यकीय सेवा खर्च इ. तसेच ते फार जिकीरीचे काम आहे. कबुतरांच्या पोषणा साठी योग्य संतुलित आहार देणे उदा - बार्ली (जव), मका, गहू, ओट्स, ब्राऊन राइस, ज्वारी, तूर, हिरवे वाटणे, जवस सुर्यफुल बिया इ. तसेच कबुतरखाने वेळोवेळी साफ करणे एवढेच नाहीतर एका विशिष्ट तापमानात कबुतरांना ठेवणे. त्यांचे शरीराचे तापमान स्थिर आहे का हे दर काही कालावधीनंतर पाहावे लागते. कबुतर हा समूहाने राहणारा पक्षी आहे जर एखादे कबुतर आजारी पडले तर इतर कबुतर पण लगेच आजारी पडतात. आजारी कबुतराला लगेच वेगळे करावे लागते. त्यांना होणार्या संसर्ग जन्य रोग पासून जपावे लागते. कबूतराचे घरटे अतिशय ओबड धोबड असते. मुळ्या, डहाळ्या, गवत आणि काटक्या वापरून केलेले असते. जंगली प्रजाती कधीकधी दुसर्या पक्ष्यांच्या घरट्याचा उपयोग करतात.कबुतर नेहमी पांढर्या स्वच्छ रंगाची दोनच अंडी घालतात. अंडी उबवण्याचा कालावधी हवामानानुसार 14 ते 18 दिवसांचा असतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पिट्युटरी हार्मोन प्रोलाक्टिनच्या मुळे जशी सस्तन प्राण्यात दुध निर्मिती होते त्याप्रमाणे नर आणि मादी मध्ये पिजन मिल्कची वाढ होत असते. त्यावरच पिल्लांचे पोषण होत असते. खाद्या सोबत ते पिल्लांना भरवले जाते. सरासरी 17-18 दिवसात अंड्यातून पिल्लू जन्मास येते. अंड्याच्या कवकाचा पहिला तडा जाऊन पिल्लू पूर्णपणे बाहेर पडण्यास 15-30 तासांचा अवधी लागतो. नवजात पिल्लाची वाढ झपाट्याने होते साधारण दोन दिवसातच पिल्लाचे वजन दुपटीने वाढते. 32-35 दिवसात त्यांची पूर्ण वाढ होऊन हवेत भरारी घेण्यास ते सक्षम होतात 2. नवजात पिल्ले कबुतरे हि वसाहत करून राहणारा पक्षी असल्यामुळे त्यांना एकमेकांचा सहवास आवडतो. त्यांचे जेथे जेथे वास्तव्य असते ती ठिकाणे अतिशय घाणेरडी असतात. गूटर- गू गूटर- गू असा नरपक्षी गळा फुगवून आवाज काढतो तेव्हा तो मादिसमोर गोलगोल फेर्या मारत असतो.बर्याच प्रजातीतील कबुतरांना पावसात भिजायला आवडते. तसेच लहान तलाव व डबक्यात स्नान करणे पसंत करतात. कबुतर पाणी पंपा सारखे ओढतो पाणी पिताना चोच संपूर्णपणे बुडवून ठेवतात. बर्याचदा कबूतरे मान ताणून घू घू असा आवाज काढतात. हा आवाज काही हाका मारण्यासाठी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी असतो. घाबरलेली कबुतरे अशा हाक सारख्या देऊन आपली पिसे व शेपटी पसरवतात काही कबूतर प्रजातीची छायाचित्रे 3. Laughing Dove
4. Spotted Dove 5.Yellow Footed Green Pigeon 6. Eurasian Collared Dove 7.Emerald Dove आरती दुगल संदर्भ - पक्षी संदर्भित पुस्तके फोटो - 1.Rock Dove - गुगल 2. नवजात पिल्ले - अमित सामंत 3.Laughing Dove - तुषार धुरी 4.Spotted Dove - गुगल 5.Yellow footed Green Pigeon -गुगल 6.Eurasian Collared Dove- गुगल 7.Emerald Dove-गुगल |
|
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |