Forum Home Forum Home > Historical and Trekking Destinations of India > Trekking Destinations
  New Posts New Posts RSS Feed - ढाकचा बहिरी  with TREKSHITIZ
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


ढाकचा बहिरी with TREKSHITIZ

 Post Reply Post Reply
Author
Message Reverse Sort Order
Shreyas Pethe View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Pune
Status: Offline
Points: 135
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Shreyas Pethe Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: ढाकचा बहिरी with TREKSHITIZ
    Posted: 11 Jun 2017 at 3:14pm
                     Valentine Day Special Trek म्हणून १४ फेब्रुवारीचा ढाक बहिरीची बुकिंग करायची होती पण जागा full झाल्यामुळे अमित दादा कडून jack लाऊन जागा पटकावल्या.नंतर काही members कमी झाल्यामुळे बसमध्ये जागा मिळेल असं संजय काकांनी सांगितलं.खूप हायसं वाटलं.

      शनिवारी सकाळी कोपरगाव वरून निघालो,दुपारी प्रथमेशकडे थांबून ७.०० च्या लोकलने महेंद्रशी बोलणं झाल्याप्रमाणे निघालो.लोणावळयाला महेंद्र आणि आरती भेटले.लगेच अहमदाबाद ट्रेनने कर्जत गाठले.पण मुंबईकरांच्या 'वक्तशीरपणा'मुळे तीन तास स्टेशनवरच काढावे लागले.रात्री एकच्या सुमारास आम्ही सांडशीकडे निघालो. काही वेळातच तिथे पोहचून पथाऱ्या पसरल्या आणि घोरायला सुरुवात केली.सकाळी ५.३० वाजता wake up call मिळाला.आन्हिकं आटोपून चहा,नाश्ता उरकला.कळकरायाचा सुळका वाट  पाहत होता..मोशे,सचिन,प्रणोती,अमृता,चिन्मय,गंगापुरकर काका बऱ्याच दिवसांनी भेटले.सुरुवातीलाच ओळख परेड झाली आणि ढाकच्या दिशेने प्रयाण केलं.

        संजय काकांच्या सूचनेनुसार थोड्या थोड्या वेळाने पाणी पोटात टाकत होतो.चाल आणि चढण असल्यामुळे दम लागत होता.मांजरसुंभा उजव्या बाजूला साथीस होताच.काही वेळातच बहिरीनाथाच्या गुहेचे दर्शन झाले.खूप जबरदस्त असणार ट्रेक बघूनच जाणवलं.गर्द वनाचा टप्पा पार करून पायथ्याला पोचलो.वाटेत एका ठिकाणी दीपमाळ व पिंड दृशीस पडते.camping साठी ती जागा योग्य वाटली पण पाण्याची व्यवस्था करावी लागेल.पायथ्यापासून कठीणता जाणवू लागली.देवस्थान असल्याने मार्ग अस्वच्छ बनला होता.दगड ठिसूळ झाले होते.उन्हाचा कडाका जाणवत होता.जाण्या-येण्याचा रस्ता एकच असल्याने traffic jam झालं होतं.दुसऱ्या एका group च्या समन्वयाने आम्ही दोर लावला आणि एक एक करून वर जायला लागलो.काका,विराज,लादेनचं मार्गदर्शन होतंच.मोशेपण धीर देत होता.Alternately,उतरणे आणि चढणे अशाप्रकारे आम्ही सर्व वर-गुहेत पोहोचलो.शेवटचा टप्पा कठीणच होता.परंतु लिंगाणा केल्याने भीती कमी झाली होती.

         गुहेत बहिरीनाथांच्या मूर्ती,पाण्याचे कुंड दुसऱ्या गुहेत स्वयंपाकाची भांडी,स्वतंत्र स्वयंपाकाची जागा आहे.बऱ्याच ग्रामस्थांचे हे कुलदैवत असल्याने माणसांचा रविवारी राबता असतो.कामशेतच्या बाजूने सव्यसाची येऊन मिळाला.विश्रांती घेऊन,photos काढून झाल्यावर उतरण्यास सुरुवात केली.आरती,मनीषा यांचा धीरच होत नव्हता.सगळ्यांनी confidence  देऊन,समजावून त्यांना खाली उतरवले.तसा अवघड नव्हता टप्पा पण मनात भीती बसली होती.काही वेळातच सगळे खाली उतरले आणि पायथ्याशी असल्याने 'त्यामोकळ्या जागेत येऊन डबे सोडले.

    प्रथमेशला थोडा पित्ताचा त्रास सुरु झाला होता..जेवण झाल्यावरच एक गोष्ट लक्षात आली,आपण गुहेतून पाणी भरायचं विसरलोय.आम्ही आमच्या bags खालीच ठेवल्याने पाणी भरायचं राहूनच गेलं.शेवटच्या काही बाटल्या शिल्लक होत्या.चारच्या सुमारास पुढे चालायला सुरुवात केली.सोबत एक कुत्रं सकाळपासून साथीला होतंच.त्याला दिलेला भात त्याने कल्पकतेने एका ठिकाणी झाकून ठेवला.खूप आश्चर्य वाटलं.परतीच्या प्रवासात पुढे मोशे,मध्ये काका व अमृता आणि मागे लादेन (सचिन लादे) होता .ऊन वाढल्यामुळे त्रास जाणवू लागला.एका ठिकाणी रस्ता काहीसा चकवा देऊन गेला.रस्ता घसरडा असल्यामुळे उतरायला वेळ लागत होता.साडेसहाच्या सुमारास उताराला लागलो.पाण्याने सर्वाचाच दम काढला.काहीशा दूरवरच्या अंतराने सांडशीमध्ये पोचलो.मस्तपैकी वडापाव हाणला.

      ट्रेकने खरच एक नवी दृष्टी दिली.खूप गोष्टी शिकवल्या.उन्हाळ्यात ट्रेक करताना तीन-चार लिटर पाणी सोबत हवंच.सगळेच दमले होते.आम्हाला कर्जत ला लवकर पोचायचे होते.चहा घेतला,पाणी भरून घेतलं.FEEDBACK SESSION मध्ये खूप गोष्टी समोर आल्या.उतरताना बरीच चाल झाल्यावर गावाजवळ एका वीटभट्टीवर पाणी प्यायलो ,त्या वेळच्या भावना शब्दात सांगणं कठीण आहेत.काकांच्या नियोजनामुळे ट्रेक सुंदर झाला.पुन्हा एकदा खूप छान छान,नवीन ओळखी झाल्या.मी आणि प्रथमेश ११.१५ पर्यंत शिवाजीनगर ला आलो.मला १२.०० ची शिर्डी गाडी मिळाली.५.१५ ला घरी पोचलो.९.०० वाजता परत कामावर रुजू.


   ढाकच्या बहिरीचे दर्शन मनाला सुखावून गेले.पावसाळ्यात हा ट्रेक करेनच सोबत कळकरायाचा सुळकापण वाट पाहतोय.

"भटका श्रेयस"
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.707 seconds.