महाविद्यालयात असताना चार डोकी एकत्र येतात, डोंगर भटकंती सुरु होते आणि त्यालाच ट्रेकींग ग्रुपचे स्वरूप मिळते अशीच काहीशी आपल्या संस्थांची कूळकथा आहे. डोंबिवलीतील अशाच तेराजणांना प्रमोद जोशीसरांनी गडकिल्ल्यांच्या, डोंगरांची ओळख करुन दिली आणि त्यातूनच 'स्वप्न दुर्गभ्रमंतीचे आव्हान क्षितिजाचे' असे ध्येय बाळगून २००१ साली क्षितिज ग्रुपची स्थापना झाली. ट्रेक क्षितिज संस्था एक NGO आहे.


* इंटरनेट युगातील या तरुणांनी केवळ भटकंती न करता गडकिल्ल्यांची नोंद करायला सुरुवात केली. तीदेखील वेबसाईटच्या माध्यमातून. त्यामुळेच २००१ साली www.trekshitiz.com (ट्रेकक्षितिज.कॉम) ही किल्ल्यांची मराठीतून माहित देणारी पहिली वेबसाईट सुरु झाली. आज या वेबसाईटवर तब्बल ३०० हुन जास्त किल्ल्यांची मराठीतून, २२० हून जास्त किल्ल्यांची इंग्रजीतून माहिती असून, सुमारे दहा हजार छायाचित्रे, ११० संगणकीय नकाशे उपलब्ध आहेत. डोंगरभटक्यांना एकत्र आणणारे विविध फोरम, अनेक संस्थांची माहिती, डोंगर गावांच्या गाड्यांचे वेळापत्रक असे अनेक गोष्टींचे भांडार या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहे. गेल्या पंधरा वर्षात ही वेबसाईट तब्बल दोन करोड लोकांनी पाहीली आहे. २००५ साली ट्रेक क्षितिजच्या वेब साईटला उत्कृष्ट मराठी वेब साईट म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास परिषदेचे तिसरे पारितोषिक मिळालेले आहे.

Trekkers Favorite

  • 1