मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अजमेरा (Ajmera) किल्ल्याची ऊंची :  2854
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुंधेश्वर रांग
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.

खाजगी वहानाने दोन दिवसात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. पहिल्या दिवशी सकाळी कोट्बारी या बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचावे. गावातून गाईड घेऊन बिष्टा किल्ला पाहावा. बिष्टा किल्ल्याला जाऊन परत गावात येण्यास ४ ते ५ तास लागतात. बिष्टा पाहून झाल्यावर जेवण करुन कर्‍हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. पायथ्यापासून कर्‍हा किल्ला पाहून परत येण्यास ३ तास लागतात. कर्‍हा किल्ला पाहून झाल्यावर देवळणेचे जोगेश्वर मंदिर पाहावे. महादेवाचे दर्शन घेऊन दुंधा किला गाठावा. तो पाहाण्यास एक तास लागतो. दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा किंवा पहाडेशवर येथे जाऊन अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा . यापैकी कुठल्याही ठिकाणी जेवणाची सोय होत नाही. आपला शिधा बरोबर बाळगावा.
5 Photos available for this fort
Ajmera
Ajmera
Ajmera
पहाण्याची ठिकाणे :
अजमेर सौंदाणे गावातून एक रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिरा शेजारी अजमेरा किल्ल्याचा डोंगर आहे. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व आपल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेऊन मंदिराच्या परिसराच्या बाहेर यावे. पहाडेश्वराच्या कपाउंडला लागून एक कच्चा रस्ता डोण्गराला लगटून पुढे जातो. या रस्त्याने चालत गेल्यावर १० मिनिटात उजव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसते. त्यात शेंदुराचे ठिपके आणि त्रिशुळ काढलेला मोठा खडक आहे. त्याला माऊली म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला एक खडक आहे. त्याला म्हसोबा म्हणतात. या म्हसोबाच्या मागे जो डोण्गर आहे त्याच्या अर्ध्या उंचीवर गुहा आहेत. त्यात आदिवासींचा डोंगरदेव आहे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगदेवाचा डोंगर ठेउन पायवाट पुढे दाट झाडीत शिरते. या झाडीतून १० मिनिटे चालल्यावर दोन डोंगरांच्या घळीतून डोंगर चढायला सुरुवात होते. साधारण अर्ध्या ते पाऊअण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश केल्यावर प्रशस्त गडमाथा दिसतो.प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस उंचावर झेंडा लावलेला दिसतो. झेंद्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. तर डाव्या बाजूला एक कोरडा तलाव आहे. पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला महादेवाचे उध्वस्त मंदिर आहे. या ठिकाणी नंदी आणि पिंड आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्य बाजूला दुसरा तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक टाक बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही. टाक पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथून आजूबाजूचा परिसर, कर्‍हा , बिष्टा हे किल्ले दिसतात. गडमाथा फ़िरण्यास अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून ८ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे अजमेर सौंदाणे हे गाव आहे. अजमेर सौंदाणे गावातून रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय सटाणा येथे आहे.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही. पहाडेश्वर मंदिरातून भरुन घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पहाडेश्वर, (अजमेर सौंदाणे) पासून १ ते १.५ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
ऑगस्ट ते फ़ेब्रुवारी
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)