मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
अंमळनेर (Amalner) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : जळगाव | श्रेणी : सोपी | ||
अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती. |
|||
|
|||
इतिहास : | |||
अंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले. |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
अंमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने व रेल्वेमार्गाने देशाशी जोडलेल आहे. |
श्रेणी: Easy | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अग्वाडा (Aguada) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) |
अकलूजचा किल्ला (Akluj Fort) | अंमळनेर (Amalner) | आंबोळगड (Ambolgad) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) |
अर्नाळा (Arnala) | औसा (Ausa) | बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) |
बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बाळापूर किल्ला (Balapur Fort) | बल्लाळगड (Ballalgad) | बांदा किल्ला (Banda Fort) |
बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) | बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | भगवंतगड (Bhagwantgad) |
भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) | भरतगड (Bharatgad) | भवानगड (Bhavangad) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) |
चापोरा किल्ला (Chapora Fort) | कुलाबा किल्ला (Colaba) | दांडा किल्ला (Danda Fort) | दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) |
दौलतमंगळ (Daulatmangal) | देवगडचा किल्ला (Devgad Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) | धारावी किल्ला (Dharavi Fort) |
धर्मापूरी (Dharmapuri) | धारूर (Dharur) | धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) | डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) |
गाविलगड (Gavilgad) | गोवा किल्ला (Goa Fort) | हिराकोट (Hirakot) | इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) |
जयगड (Jaigad) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | काकती किल्ला (Kakati Fort) | काळाकिल्ला (Kala Killa) |
कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) | केळवे किल्ला (Kelve Fort) | खर्डा (Kharda) |
खारेपाटण (Kharepatan fort) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोटकामते (Kotkamate) | लहुगड (Lahugad) |
लोंझा (Lonza) | माचणूर (Machnur) | मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) |
महादेवगड (Mahadevgad) | माहीमचा किल्ला (Mahim Fort) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) |
नगरधन (Nagardhan) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) |
नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) | नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) | नरनाळा (Narnala) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
निवतीचा किल्ला (Nivati Fort) | पाचाड कोट (Pachad Fort) | पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) | पालचा किल्ला (Pal Fort) |
पळशीचा किल्ला (Palashi Fort) | पन्हाळगड (Panhalgad) | परांडा (Paranda) | पारडी किल्ला (Pardi Fort) |
पारोळा (Parola) | पिलीवचा किल्ला (Piliv Fort) | पिंपळास कोट (Pimplas Kot) | प्रतापगड (Pratapgad) |
पूर्णगड (Purnagad) | ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse)) | राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) | राजकोट (Rajkot) |
रामदुर्ग (Ramdurg) | रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | रेवदंडा (Revdanda) | रिवा किल्ला (Riwa Fort) |
सामराजगड (Samrajgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan)) | साटवलीचा किल्ला (Satavali Fort) |
शिवडीचा किल्ला (Sewri Fort) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) | शिवथरघळ (Shivtharghal) | सिंधुदुर्ग (Sindhudurg) |
सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) | सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort)) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) |
सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik)) | सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुधागड (Sudhagad) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) |
तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) | उदगीर (Udgir) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) | वसई (Vasai) |
विजयदुर्ग (Vijaydurg) | वरळीचा किल्ला (Worli Fort) | यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort)) | यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) |
यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |