मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
अंबागड (Ambagad) | किल्ल्याची ऊंची :  1500 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: अंबागड | ||||
जिल्हा : भंडारा | श्रेणी : मध्यम | ||||
नागपूर पासून १०० किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंबागड नावाचा सुंदर पण अल्पपरिचित किल्ला आहे . किल्ल्याचे बांधकाम त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने मजबूतीकरण केल्यामुळे किल्ला उत्तम अवस्थेत आजही उभा आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झालेले आहे . |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
गौंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवीसन १७०० च्या सुमारास उभारला . पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला . |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
पायऱ्याच्या मार्गाने साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो . किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे . बुरुजामध्ये जंग्या आणि वरच्या बाजूला चर्या आहेत . प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत . प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आहेत देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जीना आहे . बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते . बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते . त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे . हे मंदिर हल्लीच्या काळात बांधलेले असावे . या मंदिराजवळ एक चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे . येथून उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीकडे जावे . फांजी वरुन पुढे जातांना २ अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत . पुढील वाट बंद झाल्याने पुन्हा देवड्यांपाशी येउन किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जातांना डाव्या बाजूला एक विहीर आहे . उजव्या बाजूला साचपाण्याचा बांधीव तलाव आहे . त्यावर एक पडकी वास्तू आहे . पुढे डाव्या बाजूच्या फांजीवर चढून पुढे जातांना ठरावीक तीन बुरुज लागतात. पुढे थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. काटकोनात वळणार्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण उध्वस्त वास्तूत प्रवेश करतो . ही वास्तू दुमजली असावी. दुसऱ्या मजल्यावर चढून गेल्यावर डाव्या कोपऱ्यात कमानदार छत असलेली उध्वस्त इमारत आहे . या इमारतीला एकही खिडकी नाही . इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे . दारु कोठार पाहून उजव्या बाजूला आल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे . विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या पायऱ्याच्या वरच्या बाजूला एक मेघडंबरी आहे . बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे . किल्ल्याचा हा भाग पाहून आल्या मार्गाने खाली उतरावे . मुख्य वाटेवर येउन बालेकिल्ल्यावर जातांना डाव्या बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरुज लागतात . बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहे . किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे . या खोलीतून बुरुजाच्या / किल्ल्याच्या बाहेर पडता येते . हा बुरुज पाहून पुन्हा किल्ल्यात येउन मधला मोकळा भाग ओलांडून पलीकडे पडक्या भिंतीतून वर चढून जावे . याठिकाणी दुमजली महाल होता आता त्यापैकी वरचा मजला नष्ट झालेला आहे . भिंतीतले कमानदार कोनाड्यावरुन आपण आज त्याचा अंदाज लावू शकतो . खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत . पण त्यात मलबा पडल्यामुळे आणि पाणी साठल्यामुळे खाली जाता येत नाही . या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे . ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे . या बुरुजात चोर दरवाजा आहे . बुरुजात असलेल्या पायऱ्यानी खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येतो . येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे . या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते . | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
१) नागपूर - जांब गाव - रामपूर - अंबागड हे अंतर ९२ किलोमीटर आहे. जांब गावातून रामपूर गाठावे रामपूर गावातून उजवीकडे एक रस्ता जातो या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आंबा गडाकडे जातो . या रस्त्याने अंबागडच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत अंतर ३ किमी आहे. या रस्त्याने मोटार सायकल किंवा चालत अंबागडाच्या पायथ्याशी जाता येते, या कच्च्या रस्त्याने न जाता डांबरी सडकेने पुढे गेल्यावर २ किलोमीटरवर अंबागड गाव आहे . या गावातल्या चौकातून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावर एक कालवा लागतो . या कालव्याच्या उजव्या काठाने एक कच्चा रस्ता अंबागड कडे जातो. या रस्त्याने गाडीने (जीप/ मोटारसायकल) थेट अंबागडच्या (३ किलोमीटर ) पायथ्याशी जाता येते . हा पूर्ण रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात या रस्त्याने गाडी जा्णे शक्य नाही . अंबागड गावातून चालत जावे लागते . किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे . तेथूनच किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत . २) नागपूर -उसर्रा - बपेरा - रामपूर - अंबागड असाही रस्ता आहे. या रस्त्याने नागपूर ते अंबागड अंतर ९४ किलोमीटर आहे. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल. | |||||
जेवणाची सोय : | |||||
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही . | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही . | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
पायथ्याच्या हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो . | |||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
वर्षभर |
श्रेणी: Medium | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अहिवंत (Ahivant) |
अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अंबागड (Ambagad) |
अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) |
आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | अवचितगड (Avchitgad) | बहुला (Bahula) |
बळवंतगड (Balwantgad) | बाणकोट (Bankot) | बारवाई (Barvai) | भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) |
भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale)) | भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje)) | भामेर (Bhamer) | भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) |
भास्करगड (बसगड) (Bhaskargad) | भवानीगड (Bhavanigad) | भिवागड (Bhivagad) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) |
भोरगिरी (Bhorgiri) | भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) |
भूपतगड (Bhupatgad) | भूषणगड (Bhushangad) | बिरवाडी (Birwadi) | बिष्टा (Bishta) |
चांभारगड (Chambhargad) | चंदन वंदन (Chandan-vandan) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) |
चौल्हेर (Chaulher) | चावंड (Chavand) | दातेगड (Dategad) | देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) |
डेरमाळ (Dermal) | देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | धाकोबा (Dhakoba) | धोडप (Dhodap) |
द्रोणागिरी (Dronagiri) | दुंधा किल्ला (Dundha) | दुर्ग (Durg) | गगनगड (Gagangad) |
किल्ले गाळणा (Galna) | गंभीरगड (Gambhirgad) | गंधर्वगड (Gandharvgad) | घनगड (Ghangad) |
घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोसाळगड (Ghosalgad) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) |
गोपाळगड (Gopalgad) | गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad)) | गोवळकोट (Gowalkot) | गुणवंतगड (Gunawantgad) |
हडसर (Hadsar) | हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) | हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg)) | हरगड (Hargad) |
हरिहर (Harihar) | हरिश्चंद्रगड (Harishchandragad) | हातगड (Hatgad) | हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) |
होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | इंद्राई (Indrai) | ईरशाळ (Irshalgad) |
जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | जंजिरा (Janjira) | जवळ्या (Jawlya) |
जीवधन (Jivdhan) | कैलासगड (Kailasgad) | कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) | काळदुर्ग (Kaldurg) |
कळसूबाई (Kalsubai) | कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri)) | कमळगड (Kamalgad) | कामणदुर्ग (Kamandurg) |
कनकदुर्ग (Kanakdurg) | कांचन (Kanchan) | कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) | कंक्राळा (Kankrala) |
कर्हा (Karha) | कर्नाळा (Karnala) | कात्रा (Katra) | कावनई (Kavnai) |
केंजळगड (Kenjalgad) | खांदेरी (Khanderi) | कोहोजगड (Kohoj) | कोकणदिवा (Kokandiva) |
कोळदुर्ग (Koldurg) | कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) | कोंढवी (Kondhavi) | कोरीगड (कोराईगड) (Korigad) |
कोर्लई (Korlai) | कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लळिंग (Laling) |
लोहगड (Lohgad) | मच्छिंद्रगड (Machindragad) | मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महिमानगड (Mahimangad) |
महिमतगड (Mahimatgad) | महिपालगड (Mahipalgad) | महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) |
माहूर (Mahurgad) | मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) | मंडणगड (Mandangad) | मानगड (Mangad) |
मंगळगड (Mangalgad) | मांगी - तुंगी (Mangi-Tungi) | माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) |
मणिकपूंज (Manikpunj) | मांजरसुभा (Manjarsubha Fort) | मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) |
मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मोहनगड (Mohangad) | मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) |
मृगगड (Mrugagad) | मुडागड (Mudagad) | मुल्हेर (Mulher) | नाणेघाट (Naneghat) |
नारायणगड (Narayangad) | निमगिरी (Nimgiri) | पाबरगड (Pabargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) |
पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पालगड (Palgad) | पांडवगड (Pandavgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) |
पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) | पारगड (Pargad) | पारनेरा किल्ला (Parnera Fort) | पर्वतगड (Parvatgad) |
पाटेश्वर (Pateshwar) | पट्टागड (Patta) | पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) |
पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) | पिंपळा (Pimpla) | पिसोळ किल्ला (Pisol) |
प्रबळगड (Prabalgad) | प्रेमगिरी (Premgiri) | पुरंदर (Purandar) | रायगड (Raigad) |
रायकोट (Raikot) | रायरेश्वर (Raireshwar) | राजदेहेर (ढेरी) (Rajdeher) | राजधेर (Rajdher) |
राजगड (Rajgad) | राजमाची (Rajmachi) | रामदरणे (Ramdarne) | रामगड (Ramgad) |
रामशेज (Ramshej) | रामटेक (Ramtek) | रांगणा (Rangana) | रांजणगिरी (Ranjangiri) |
रसाळगड (Rasalgad) | रतनगड (Ratangad) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) | रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) |
रोहीडा (Rohida) | रोहिलगड (Rohilgad) | सडा किल्ला (Sada Fort) | सदानंदगड (Sadanandgad) |
सदाशिवगड (Sadashivgad) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सज्जनगड (Sajjangad) | साल्हेर (Salher) |
सालोटा (Salota) | सामानगड (Samangad) | संतोषगड (Santoshgad) | सप्तश्रुंगी (Saptashrungi) |
सरसगड (Sarasgad) | सेगवा किल्ला (Segawa) | शिवगड (Shivgad) | शिवनेरी (Shivneri) |
सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) | सिंदोळा (Sindola) | सिंहगड (Sinhagad) | सोंडाई (Sondai) |
सोनगड (Songad) | सोनगिर (धुळे) (Songir (Dhule)) | सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुमारगड (Sumargad) |
सुरगड (Surgad) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) | सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | ताहुली (Tahuli) |
टकमक गड (Takmak) | तळगड (Talgad) | तांदुळवाडी (Tandulwadi) | टंकाई (टणकाई) (Tankai) |
थाळनेर (Thalner) | तिकोना (Tikona) | तोरणा (Torna) | त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) |
त्रिंगलवाडी (Tringalwadi) | तुंग (Tung) | तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंबरखिंड (Umberkhind) |
उंदेरी (Underi) | वैराटगड (Vairatgad) | वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वर्धनगड (Vardhangad) |
वारुगड (Varugad) | वसंतगड (Vasantgad) | वासोटा (Vasota) | वेताळगड (Vetalgad) |
वेताळवाडी गड (Vetalwadi gad) | विजयगड (Vijaygad) | विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) | विसापूर (Visapur) |
विशाळगड (Vishalgad) | वाघेरा किल्ला (Waghera) |