मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अर्जूनगड (Arjungad) किल्ल्याची ऊंची :  400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : वलसाड (गुजरात) श्रेणी : मध्यम
एका दंतकथेनुसार अर्जुनाने या ठिकाणीहून सुभद्राहरण केले म्हणून या किल्ल्याचे नाव अर्जूनगड पडले. चिमाजी आप्पांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. काही काळ हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. अर्जूनगडावर महालक्ष्मीचे देऊळ आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. गडावर भाविकांची ये जा चालू असते.
9 Photos available for this fort
Arjungad
पहाण्याची ठिकाणे :
पायर्‍यांच्या मार्गाने एका मोठ्या बुरुजाला वळासा घालून १० मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशव्दार, तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटा घेर दिसतो. किल्ल्याच्या मधोमध महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ६ बुरुज आहेत. तटबंदी वरुन फ़िरताना दक्षिणेकडे कोलाक नदी दिसते. किल्ला फ़िरायला १० मिनिटे पुरतात.

पोहोचण्याच्या वाटा :
वापी - सुरत रेल्वेमार्गावर बगवाडा नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने बगवाडाला जाता येते. बगवाडा स्थानकातून अर्जूनगड किल्ला अंतर २ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापी पासून ६ किलोमीटरवर अर्जूनगड किल्ला आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च
जिल्हा Valsad (Gujrat)
 अर्जूनगड (Arjungad)  इंद्रगड (Indragad)  पारडी किल्ला (Pardi Fort)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)