मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बहादरपूर (Bahadarpur Fort) किल्ल्याची ऊंची :  50
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : जळगाव श्रेणी : सोपी
जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे.
9 Photos available for this fort
Bahadarpur Fort
इतिहास :
इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाला बोरी नदीच्या बाजूने दोन भक्कम बुरुज व तटबंदी आहे. त्यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्‍या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बहादरपूर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात येते. पारोळ्या पासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे.

२) धुळे - जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
सूचना :
अंमळनेर (२० किमी) - पारोळा (८ किमी) - बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहता येतात.
जिल्हा Jalgaon
 अंमळनेर (Amalner)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))
 पालचा किल्ला (Pal Fort)  पारोळा (Parola)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))