मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

दार्‍या घाट (Darya Ghat) किल्ल्याची ऊंची :  3050
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुर्ग - धाकोबा
जिल्हा : ठाणे श्रेणी : कठीण
प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल विविध मार्गांनी घाटमाथ्यावर जात असे. उत्तर कोकणातील शूर्पारक म्हणजेच नालासोपारा, कल्याण इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटवाटांनी जुन्नर या घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या मार्गावर नाणेघाट सारखा प्रसिद्ध प्रशस्त घाट आहे. तसेच दार्‍या घाटा सारखा काहीसा अपरिचित घाट आहे. दार्‍या घाटाच्या रक्षणासाठी दुर्ग आणि धाकोबा (ढाकोबा) हे दोन किल्ले आहेत. या घाट मार्गाजवळ पळू सोनावळे येथे गणेश गडद ही लेणी आहेत. नाणेघाटा इतका दार्‍या घाट प्रसिध्द नसला तरी ट्रेकर्स लोकांना तो परिचित आहे दुर्ग - धाकोबा - दार्‍या घाट असा दोन दिवसाचा ट्रेक करता येतो. अधिक माहितीसाठी साईटवरील दुर्ग आणि धाकोबाची माहिती वाचावी.

16 Photos available for this fort
Darya Ghat
पहाण्याची ठिकाणे :
दार्‍या घाटाच्या पायथ्याचे कोकणातले गाव आहे पळू सोनावळे. सिंगापूर ही या गावाची एक वाडी आहे या वाडीतून दार्‍या घाटाला जाणारी वाट आहे. या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आपण पण दाट झाडीत शिरतो. जंगलातून जाणारी वाट आपल्याला तासभरात दार्‍या घाटाच्या नळीच्या खालच्या अंगाला घेऊन जाते. सह्याद्रीच्या रांगांमधील चिंचोळ्या घळीला नळी म्हटले जाते. नळीतून चढताना लहान-मोठे खडक सर्वत्र पडलेले दिसतात त्या खडकांना चुकवत, पार करत खडा चढ चढावा लागतो. साधारणपणे चार तासात आपण नळीच्या वरच्या टोकावर पोहोचतो. या ठिकाणी शेंदूर लावलेले काही दगड ठेवलेले आहेत. येथून खाली पाहिले असता आपल्याला कोकणातील पळू सोनावळे गाव आणि तलाव दिसतो. डाव्या बाजूला नानाचा अंगठा, नाणेघाट, जीवधन हे डोंगररांग दिसते. तर उजव्या बाजूला धाकोबा किल्ला आणि दुर्ग किल्ल्याची डोंगररांग दिसते. दार्‍या घाट चढून आल्यावर एक टेकडी उतरल्यावर डावीकडील ठळक वाट आंबोली गावाकडे जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण आंबोली गावात पोहोचतो. कोकणातील पळू सोनावळे गाव ते आंबोली गाव हे अंतर दार्‍या घाटातून चढत जाण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा तास लागतात. आंबोली गावातून दार्‍या घाटाने सोनावळे गावात उतरण्यासाठी चार तास लागतात. पळू सोनावळे गावाजवळ जंगलातून जाणारी वाट चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दार्‍या घाटासाठी वाटाड्या घेणे आवश्यक आहे . आंबोली आणि पळू सोनावळे या दोन्ही ठिकाणी वाटाडे मिळतात .
पोहोचण्याच्या वाटा :
दार्‍या घाटाचा ट्रेक दोन मार्गांनी करता येतो. १) घाटमाथ्यावरील आंबोली गाव - दार्‍या घाट - पळू सोनावळे गाव. हा उतराईचा ट्रेक आहे २) कोकणातील पळू सोनावळे गाव - दार्‍या घाट - आंबोली गाव हा चढाईचा ट्रेक आहे.

१) आंबोली मार्गे दार्‍या घाट :- जुन्नर - आपटाळे मार्गे आंबोली गावात जाण्यासाठी जुन्नरहून एसटीची बस दर तासाला आहे. आंबोली गावा़च्या अलिकडे उच्छिल गाव आहे तेथपर्यंत जाण्यासाठी जीप्स आहेत. आंबोली गावात रस्ता संपतो तेथून एक वाट दार्‍या घाटाकडे जाते. या वाटेने एक टेकडी चढून गेल्यावर उजवीकडे जाणारी वाट दार्‍या घाटकडे जाते. डावीकडील वाट धाकोबा किल्ल्याकडे जाते.

२) पळू सोनावळे मार्गे दार्‍या घाट :- कल्याण - धसई - पळू सोनावळे - सिंगापूर हे अंतर ६४ किलोमीटर आहे. सिंगापूर या पळू सोनावळे गावाच्या वाडीतून दार्‍या घाटात जाणारी वाट आहे.

राहाण्याची सोय :
दार्‍या घाटात राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
दार्‍या घाटात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
दार्‍या घाटात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबोली गाव - दार्‍या घाट - पळू सोनावळे गाव ४ तास लागतात. पळू सोनावळे गाव - दार्‍या घाट - आंबोली गाव
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
श्रेणी: Hard
 भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  बितनगड (Bitangad)  चंदेरी (Chanderi)
 दार्‍या घाट (Darya Ghat)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  गोरखगड (Gorakhgad)  कलाडगड (Kaladgad)
 कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खैराई किल्ला (Khairai)  कुलंग (Kulang)
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोरगिरी (Morgiri)  न्हावीगड (Nhavigad)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)
 प्रचितगड (Prachitgad)  रवळ्या (Rawlya)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  सिध्दगड (Sidhhagad)