मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गंधर्वगड (Gandharvgad) किल्ल्याची ऊंची :  3004
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कोल्हापूर
जिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम
Gandharvagad
10 Photos available for this fort
Gandharvgad
इतिहास :
सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. १५ जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले. २८ जुलै १६८७ च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाइ व हुकेरी परगण्याचा देसाइ आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना अजमनगर/बेळगावची व हुकेरी देसायांना चंदगड व आजर्‍याची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते. या किल्ल्याचा ताबा बरीच वर्षे आदिलशाहीशी जवळीक असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. पुढे १८४४ च्या बंडात इंग्रजांनी या गडाची बरीच नासधूस केली.
पहाण्याची ठिकाणे :
वाळकोळी गावातून गड चढायला सुरुवात केल्यानंतर, आपण तासाभरात गडाच्या माथ्यावर पोहचतो. गडावर प्रवेश करताना आपणास दरवाजाचे अवशेष दिसतात. सडकेच्या उजव्या हाताला दगडी चौथर्‍यावर हनुमंताची मूर्ती आहे. येथून पुढे जाताना आपणास मार्गाच्या दुतर्फा गडावरील वस्ती दिसते. या मार्गाने आपण गावाचे दैवत चाळोबा मंदिरात येऊन पोहचतो.मंदिराजवळ एक नागशिल्प आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर एक प्राचिन विहिर लागते. या विहिरीचे पाणी गावातील लोक वापरतात. ही विहिर पाहून आपण गडाच्या दक्षिण तटबंदीवर यायचे. ही तटबंदी फारच प्रशस्त आहे. याच तटबंदीमध्ये ३ चोरदरवाजे आढळतात. ही तटबंदी पाहून आपण पुन्हा चाळोबा मंदिरासमोर यायचे. समोर शाळा आहे शाळेचे क्रिडांगण ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पूर्वी हेरेकर सावंतांच्या वाडयाचे अवशेष होते. परंतु गंधर्वगडवासियांना या अवशेषांचे ऐतिहासिक महत्व न कळल्यामुळे त्यांनी तो वाडा भुइसपाट करुन क्रिडांगण तयार केले. गडफेरीत आपणास एक बुजलेली विहिर दिसते. गडाच्या पूर्व बाजूला जुने चौथरे दिसतात.


पोहोचण्याच्या वाटा :
१) कोल्हापूरहून चंदगडाची एसटी पकडायची. चंदगड यायच्या अगोदर साधारण १० किमी वर वळकुळी नावाचे गाव आहे. इथे उतरुन डाव्या हाताचा रस्ता पकडायचा आणि गंधर्वगडवर पोहोचायचे. वळकुळी ते गंधर्वगड ही साधारण अर्ध्या तासाची चाल आहे. गडाच्या पायथ्याशी आणि गडातील वस्तीलासुद्धा गंधर्वगड म्हणतात.
२) स्वत:चे वाहन असल्यास बेळगाव - शिनोळी मार्गे नागनवाडी गाठायची. नागनवाडी गावातून २० मिनिटांच्या अंतरावर वाळकुळी गाव आहे. गंधर्वगडावर थेट गाडी रस्ता गेला असल्याने स्वत:ची गाडी असल्यास थेट गडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर निवासाची व्यवस्था आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: G
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोवा किल्ला (Goa Fort)
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)