मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गोवा किल्ला (Goa Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी
हर्णेच्या किनार्‍यावर सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी जी दुर्गत्रयी बांधली आहे त्यापैकी एक गोवा किल्ला, इतर दोन किल्ले कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा हा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे. तसेच सदयस्थितीत बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत उभा आहे.




Goa Fort
16 Photos available for this fort
Goa Fort
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक व समुद्राच्या दिशेने एक असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो दगडांनी बंद केलेला आहे. दरवाज्याच्या चौथर्‍याच्या तळाशी वाघाची आकृती आहे. डाव्या हातास दरवाजावर गंडभेरुड(म्हणजे द्विमुखी गरुड) व त्याने पायात पकडलेले चार हत्ती असे शिल्प आहे. दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दुर्मिळ शिल्पात ३ कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपापल्या जबड्यात पकडले आहेत व पायात प्रत्येकी दोन हत्ती पकडले आहेत. हत्तींनी आपापल्या सोंडांनी दुसर्‍या हत्तींच्या शेपट्या पकडल्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजा समोरील तटावर मारुतीची मुर्ती आहे. किल्ल्यात एक साचपाण्याचे टाक आहे. किल्ल्याच्या दक्षिणभागात नैसर्गिक उंचवटा आहे, त्यावर किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. तटाला असलेल्या पायर्‍यांनी तटावर चढून तटफेरी मारता येते. गडावर कलेक्टरच्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. १८६२ मध्ये किल्ल्यावर ६९ तोफा व १९ शिपाइ असल्याचा उल्लेख आढळतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून दापोली मार्गे १५ कि.मीवर असणार्‍या मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या गावातून हर्णे बंदराकडे चालत जाताना उजव्या बाजूस, समुद्रकिनार्‍यावर गोवा किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे रहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) मुरुड हर्णेला राहून सूवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहाता येतात.
२) सूवर्णदुर्ग, कनकदुर्ग व फत्तेगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Ratnagiri
 आंबोळगड (Ambolgad)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  भवानीगड (Bhavanigad)
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  गोपाळगड (Gopalgad)  गोवळकोट (Gowalkot)
 जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  महिमतगड (Mahimatgad)
 महिपतगड (Mahipatgad)  मंडणगड (Mandangad)  माणिकदूर्ग (Manikdurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)
 पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  रसाळगड (Rasalgad)  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सुमारगड (Sumargad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  विजयगड (Vijaygad)
 यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))