मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
जवळ्या (Jawlya) | किल्ल्याची ऊंची :  4055 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: सातमाळ | ||
जिल्हा : नाशिक | श्रेणी : मध्यम | ||
रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रवळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. तो प्रथम पाहून नंतर जवळ्या किल्ला पाहावा. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात. रवळ्याची माहिती साईटवर दिलेली आहे , ती वाचावी. |
|||
|
|||
इतिहास : | |||
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या. |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
जवळ्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट, वस्तीपासून समोर सरळ चालत गेल्यावर एक डोंगरसोंड लागते. या डोंगरसोंडेवर चढून गेल्यावर एका ठिकाणी वाट डावीकडे वळते. वाट मळलेली असल्याने चुकायचा संभव नाही. वाटेत जातांना उजवीकडच्या कड्यामध्ये कोरलेल्या काही गुहा आहेत. या गुहा म्हणजे कधीतरी अपूर्ण सोडून दिलेल्या लेण्यांचा भाग आहे. वाटेने तसेच पुढे जायचे, एका डोंगरसोंडेवर येऊन वाट वर चढते. इथेच खालून डोंगरसोंडेवर चढत येणारी दुसरी वाट येऊन मिळते. इथून पुढे जाणारा रस्ता म्हणजे कड्यात कोरलेल्या पायर्या आहेत. पायर्या जरा जपूनच चढाव्या लागतात. थोडे चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा दरवाजा लागतो. त्याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. पायर्या चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या दुसर्या टोकाशी पोहोचतो. दरवाज्यातून वर आल्यावर एक वाट वर जाते. दुसरी वाट डावीकडे वळते. इथे कातळात कोरलेल्या गुहा आहेत. या गुहेत एक पाण्याचे टाके आहे. हे पाहून परत माथ्यावर जायचे. वर चढून गेल्यावर एक वाट समोर टेकाडावर जाते. ही वाट किल्ल्याच्या दुसर्या टोकाशी जाते. या टोकावरुन डावीकडे खाली गेले की कड्यात खोदलेली खांब टाकी आहेत. त्याच्या समोरच पाण्याची दोन कातळात खोदलेली टाकी सुध्दा आहेत. या पैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या शिवाय किल्ल्यावर घोड्याच्या पागा आहेत. किल्ल्यावरुन घोडप, इखारा, कण्हेरगड, कंचना इंद्राई किल्ले दिसतात. जवळ्या पाहून पून्हा पठारावर परतायचे. दोन्ही किल्ले पाहून पठारावर यायला ६ ते ७ तास लागतात. या पठारावर जी वस्ती आहे तिचे नाव ‘तिवारी’ वस्ती. तिवारी नामक व्यक्तीने इथे ३ ते ४ घरे बांधली आहेत. सध्या त्यांचा उपयोग गोठा म्हणून होतो. वस्तीच्या समोरच पठारावर एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. त्याच्याच पुढे समाधी आहेत. या पठारावरचा मुक्काम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे. | |||
राहाण्याची सोय : | |||
पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो. | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पाण्याची सोय आहे. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
सप्टेंबर ते मार्च |
श्रेणी: Medium | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अहिवंत (Ahivant) |
अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अंबागड (Ambagad) |
अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) |
आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | अवचितगड (Avchitgad) | बहुला (Bahula) |
बळवंतगड (Balwantgad) | बाणकोट (Bankot) | बारवाई (Barvai) | भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) |
भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale)) | भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje)) | भामेर (Bhamer) | भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) |
भास्करगड (बसगड) (Bhaskargad) | भवानीगड (Bhavanigad) | भिवागड (Bhivagad) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) |
भोरगिरी (Bhorgiri) | भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) |
भूपतगड (Bhupatgad) | भूषणगड (Bhushangad) | बिरवाडी (Birwadi) | बिष्टा (Bishta) |
चांभारगड (Chambhargad) | चंदन वंदन (Chandan-vandan) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) |
चौल्हेर (Chaulher) | चावंड (Chavand) | दातेगड (Dategad) | देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) |
डेरमाळ (Dermal) | देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | धाकोबा (Dhakoba) | धोडप (Dhodap) |
द्रोणागिरी (Dronagiri) | दुंधा किल्ला (Dundha) | दुर्ग (Durg) | गगनगड (Gagangad) |
किल्ले गाळणा (Galna) | गंभीरगड (Gambhirgad) | गंधर्वगड (Gandharvgad) | घनगड (Ghangad) |
घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोसाळगड (Ghosalgad) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) |
गोपाळगड (Gopalgad) | गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad)) | गोवळकोट (Gowalkot) | गुणवंतगड (Gunawantgad) |
हडसर (Hadsar) | हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) | हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg)) | हरगड (Hargad) |
हरिहर (Harihar) | हरिश्चंद्रगड (Harishchandragad) | हातगड (Hatgad) | हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) |
होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | इंद्राई (Indrai) | ईरशाळ (Irshalgad) |
जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | जंजिरा (Janjira) | जवळ्या (Jawlya) |
जीवधन (Jivdhan) | कैलासगड (Kailasgad) | कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) | काळदुर्ग (Kaldurg) |
कळसूबाई (Kalsubai) | कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri)) | कमळगड (Kamalgad) | कामणदुर्ग (Kamandurg) |
कनकदुर्ग (Kanakdurg) | कांचन (Kanchan) | कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) | कंक्राळा (Kankrala) |
कर्हा (Karha) | कर्नाळा (Karnala) | कात्रा (Katra) | कावनई (Kavnai) |
केंजळगड (Kenjalgad) | खांदेरी (Khanderi) | कोहोजगड (Kohoj) | कोकणदिवा (Kokandiva) |
कोळदुर्ग (Koldurg) | कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) | कोंढवी (Kondhavi) | कोरीगड (कोराईगड) (Korigad) |
कोर्लई (Korlai) | कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लळिंग (Laling) |
लोहगड (Lohgad) | मच्छिंद्रगड (Machindragad) | मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महिमानगड (Mahimangad) |
महिमतगड (Mahimatgad) | महिपालगड (Mahipalgad) | महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) |
माहूर (Mahurgad) | मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) | मंडणगड (Mandangad) | मानगड (Mangad) |
मंगळगड (Mangalgad) | मांगी - तुंगी (Mangi-Tungi) | माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) |
मणिकपूंज (Manikpunj) | मांजरसुभा (Manjarsubha Fort) | मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) |
मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मोहनगड (Mohangad) | मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) |
मृगगड (Mrugagad) | मुडागड (Mudagad) | मुल्हेर (Mulher) | नाणेघाट (Naneghat) |
नारायणगड (Narayangad) | निमगिरी (Nimgiri) | पाबरगड (Pabargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) |
पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पालगड (Palgad) | पांडवगड (Pandavgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) |
पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) | पारगड (Pargad) | पारनेरा किल्ला (Parnera Fort) | पर्वतगड (Parvatgad) |
पाटेश्वर (Pateshwar) | पट्टागड (Patta) | पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) |
पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) | पिंपळा (Pimpla) | पिसोळ किल्ला (Pisol) |
प्रबळगड (Prabalgad) | प्रेमगिरी (Premgiri) | पुरंदर (Purandar) | रायगड (Raigad) |
रायकोट (Raikot) | रायरेश्वर (Raireshwar) | राजदेहेर (ढेरी) (Rajdeher) | राजधेर (Rajdher) |
राजगड (Rajgad) | राजमाची (Rajmachi) | रामदरणे (Ramdarne) | रामगड (Ramgad) |
रामशेज (Ramshej) | रामटेक (Ramtek) | रांगणा (Rangana) | रांजणगिरी (Ranjangiri) |
रसाळगड (Rasalgad) | रतनगड (Ratangad) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) | रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) |
रोहीडा (Rohida) | रोहिलगड (Rohilgad) | सडा किल्ला (Sada Fort) | सदानंदगड (Sadanandgad) |
सदाशिवगड (Sadashivgad) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सज्जनगड (Sajjangad) | साल्हेर (Salher) |
सालोटा (Salota) | सामानगड (Samangad) | संतोषगड (Santoshgad) | सप्तश्रुंगी (Saptashrungi) |
सरसगड (Sarasgad) | सेगवा किल्ला (Segawa) | शिवगड (Shivgad) | शिवनेरी (Shivneri) |
सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) | सिंदोळा (Sindola) | सिंहगड (Sinhagad) | सोंडाई (Sondai) |
सोनगड (Songad) | सोनगिर (धुळे) (Songir (Dhule)) | सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुमारगड (Sumargad) |
सुरगड (Surgad) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) | सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | ताहुली (Tahuli) |
टकमक गड (Takmak) | तळगड (Talgad) | तांदुळवाडी (Tandulwadi) | टंकाई (टणकाई) (Tankai) |
थाळनेर (Thalner) | तिकोना (Tikona) | तोरणा (Torna) | त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) |
त्रिंगलवाडी (Tringalwadi) | तुंग (Tung) | तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंबरखिंड (Umberkhind) |
उंदेरी (Underi) | वैराटगड (Vairatgad) | वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वर्धनगड (Vardhangad) |
वारुगड (Varugad) | वसंतगड (Vasantgad) | वासोटा (Vasota) | वेताळगड (Vetalgad) |
वेताळवाडी गड (Vetalwadi gad) | विजयगड (Vijaygad) | विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) | विसापूर (Visapur) |
विशाळगड (Vishalgad) | वाघेरा किल्ला (Waghera) |