काकती किल्ला
(Kakati Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
2600 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : बेळगाव |
श्रेणी : सोपी |
बेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती . कित्तुर राणी चेनम्मा यांचे माहेर काकती, कोल्हापूर दिशेला बेळगावपासून ११ किमी अंतरावर आहे त्या ठिकाणी मध्यम उंचीच्या डोंगरावर एक छोटेखानी किल्ला आहे.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
हा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे . आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे . या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . किल्ल्यावर वनखात्याने मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते .
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे . गावाच्या मागे किल्ला आहे . या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही |
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर किंवा गावात जेवणाची सोय नाही .
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |