मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

काळाकिल्ला (Kala Killa) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी
आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती. ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारीक शत्रु सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक ‘‘काळ किल्ला‘‘ म्हणून ओळखतात.


Kalakilla
6 Photos available for this fort
Kala Killa
इतिहास :
इ.स १७३७ मध्ये मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर () ह्याने मिठी नदी काठी किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या ‘‘सालशेत बेटावर‘‘ आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये "काळा किल्ला" ह्या नावाने ओळखला जातो. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे मुंबी बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती.
पहाण्याची ठिकाणे :
सदर किल्ला जगप्रसिध्द धारावी झोपडपट्टीत असल्यामुळे सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत व त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचर्‍याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार, जीना व फांजी यांचे अवशेष दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवरुन साधारण १० मिनीटे चालल्यावर, ओ.एन.जी.सी.बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला किल्ला आहे. किल्ल्यात जाण्यासाठी वाट नाही. ८ फुट भिंत चढून जावी लागते.
सूचना :
काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला हे तीनही किल्ले सायन मध्ये आहेत.हे तीनही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात. स्व:तचे वाहान असल्यास एका दिवसात या तीन किल्ल्यांबरोबर शिवडीचा किल्ला, वरळीचा किल्ला, माहिमचा किल्ला, व बांद्र्याचा किल्ला हे किल्ले पाहाता येतात.
मुंबईच्या इतर किल्ल्यांची माहिती साईट्वर दिलेली आहे.
जिल्हा Mumbai
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  वरळीचा किल्ला (Worli Fort)