मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) किल्ल्याची ऊंची :  3582
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
अजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड, इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.
8 Photos available for this fort
Kanhergad(Nashik)
Kanhergad (Nashik)
Kanhergad (Nashik)
पहाण्याची ठिकाणे :
गडावर पोहोचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशस्त आहे.गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या ,रवळ्या जवळ्या, धोडप, कंचना ,हंड्या अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.
१ नाशिक - नांदुरी मार्गे :-
नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणार्‍या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ किमी अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ किमी अंतरावर असणार्‍या ‘सादडविहीर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.

२ नाशिक - कळवण मार्गे:-
नाशिक - कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार्‍या कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.

या दोन्ही वाटा वर खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सादडविहीर गावातून दीड तास लागतो तर कण्हेरवाडीतून २ तास लागतात.
जिल्हा Nasik
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजमेरा (Ajmera)
 अलंग (Alang)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)  औंढा (अवंध) (Aundha)
 बहुला (Bahula)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भिलाई (Bhilai Fort)  बिष्टा (Bishta)
 चांदवड (Chandwad)  चौल्हेर (Chaulher)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)
 धोडप (Dhodap)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))
 किल्ले गाळणा (Galna)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  हरगड (Hargad)  हरिहर (Harihar)
 हातगड (Hatgad)  इंद्राई (Indrai)  जवळ्या (Jawlya)  कांचन (Kanchan)
 कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  खैराई किल्ला (Khairai)  कुलंग (Kulang)  मदनगड (Madangad)
 मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  मणिकपूंज (Manikpunj)  मार्कंड्या (Markandeya)
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मुल्हेर (Mulher)
 नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)  पर्वतगड (Parvatgad)  पिंपळा (Pimpla)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्रेमगिरी (Premgiri)  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)
 रामशेज (Ramshej)  रांजणगिरी (Ranjangiri)  रवळ्या (Rawlya)  साल्हेर (Salher)
 सालोटा (Salota)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सोनगड (Songad)  सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))
 टंकाई (टणकाई) (Tankai)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)  त्रिंगलवाडी (Tringalwadi)  वाघेरा किल्ला (Waghera)