मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कर्नाळा (Karnala) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या खालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे.
4 Photos available for this fort
Karnala
Kille Karnala Map
Kille Karnala Map
इतिहास :
किल्ल्यांमध्ये असणार्‍या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणार्‍या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला. त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे. प्रवेशव्दा्रातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक मोठा वाडा आहे, वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.
सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१ मुंबई - गोवा मार्गाने:-
मुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसर लागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एसटी बस येथे थांबते, समोरच असणार्‍या पक्षी संग्रहालया जवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास लागतात.

२ रसायनी - आपटा मार्गाने :-
रसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. या वाटेने साधारण ३ तास लागतात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणार्‍या शासकीय विश्रामधामात, हॉटेल्स मध्ये रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कर्नाळा पायथ्यापासून २ १/२ तास लागतात.
सूचना :
कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्यावर मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळॆ येथे आरडाओरड करु नये तसेच आग पेटवू नये..
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)