मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

लिंगाणा (Lingana) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : अत्यंत कठीण
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे कातळ २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह होते. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय होता. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद होत असत.
5 Photos available for this fort
Lingana
इतिहास :
मोर्‍यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत. ( रायगडाची जीवनकथा पृ ३,४) १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. ( रायगडाची जीवनकथा पृ २४) लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाच्या रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. ( रायगडाची जीवनकथा पृ १३०) या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती.( रायगडाची जीवनकथा पृ १३१).लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. ( रायगडाची जीवनकथा पृ १३५) तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली ( रायगडाची जीवनकथा पृ १३९).रायगड नंतर लिंगाणा पडला रायगडाच्या खोर्‍यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले. ( रायगडाची जीवनकथा पृ १८८)

पहाण्याची ठिकाणे :
लिंगाण्या वरील गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे राहू शकतात. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की, आपण एका कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्‍या आहेत, ज्या वरती असलेल्या गुहांपर्यंत जातात. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे.
लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका आहे. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत: घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आगळाच आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
या गडावर जाण्यास प्रथम आपणास महाडला यावे लागते. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर पुढे घसरड्या वाटेवरून आपण अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.
राहाण्याची सोय :
गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरड्या वाटेवर थोड्या पुढे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून ८ ते ९ तास लागतात.
सूचना :
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
प्रकार: Hill forts
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अग्वाडा (Aguada)
 अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)
 अलंग (Alang)  अंबागड (Ambagad)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)
 अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)
 बहुला (Bahula)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)
 बांदा किल्ला (Banda Fort)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  भगवंतगड (Bhagwantgad)
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))
 भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)
 भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)  भवानीगड (Bhavanigad)  भिलाई (Bhilai Fort)
 भीमाशंकर (Bhimashankar)  भिवागड (Bhivagad)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)
 भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)
 भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)
 चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)
 चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चांदवड (Chandwad)  चापोरा किल्ला (Chapora Fort)  चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)
 चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)
 दातेगड (Dategad)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोपाळगड (Gopalgad)
 गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)  गुणवंतगड (Gunawantgad)
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 होन्नुर किल्ला (Honnur Fort)  इंद्रगड (Indragad)  इंद्राई (Indrai)  ईरशाळ (Irshalgad)
 जंगली जयगड (Jangli Jaigad)  जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))  जंजिरा (Janjira)  जवळ्या (Jawlya)
 जीवधन (Jivdhan)  कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)  कलाडगड (Kaladgad)
 कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कांचन (Kanchan)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))
 कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)  कर्नाळा (Karnala)
 कात्रा (Katra)  कावनई (Kavnai)  केंजळगड (Kenjalgad)  खैराई किल्ला (Khairai)
 खारेपाटण (Kharepatan fort)  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लहुगड (Lahugad)
 लळिंग (Laling)  लिंगाणा (Lingana)  लोहगड (Lohgad)  लोंझा (Lonza)
 मच्छिंद्रगड (Machindragad)  मदनगड (Madangad)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)
 महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)
 माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मलंगगड (Malanggad)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)
 मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)
 माणिकदूर्ग (Manikdurg)  माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)
 मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))
 मोहनगड (Mohangad)  मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)
 मृगगड (Mrugagad)  मुल्हेर (Mulher)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नाणेघाट (Naneghat)
 नारायणगड (Narayangad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  न्हावीगड (Nhavigad)
 निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)  पाबरगड (Pabargad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)
 पदरगड (Padargad)  पालचा किल्ला (Pal Fort)  पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)
 पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पन्हाळगड (Panhalgad)  पारडी किल्ला (Pardi Fort)
 पारगड (Pargad)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)
 पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))
 पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळा (Pimpla)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  प्रबळगड (Prabalgad)  प्रचितगड (Prachitgad)
 प्रतापगड (Pratapgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)  रायगड (Raigad)
 रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)
 राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  राजमाची (Rajmachi)
 रामदरणे (Ramdarne)  रामदुर्ग (Ramdurg)  रामगड (Ramgad)  रामशेज (Ramshej)
 रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)  रांजणगिरी (Ranjangiri)  रसाळगड (Rasalgad)
 रतनगड (Ratangad)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  रवळ्या (Rawlya)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)  सडा किल्ला (Sada Fort)
 सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सज्जनगड (Sajjangad)
 साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)  सामराजगड (Samrajgad)
 सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)
 सरसगड (Sarasgad)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिवगड (Shivgad)
 शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिध्दगड (Sidhhagad)
 सिंदोळा (Sindola)  सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुधागड (Sudhagad)  सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)
 सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  ताहुली (Tahuli)  तैलबैला (Tailbaila)  टकमक गड (Takmak)
 तळगड (Talgad)  तांदुळवाडी (Tandulwadi)  टंकाई (टणकाई) (Tankai)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)
 थाळनेर (Thalner)  तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)
 त्रिंगलवाडी (Tringalwadi)  तुंग (Tung)  तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))  उदगीर (Udgir)
 उंबरखिंड (Umberkhind)  वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))
 वर्धनगड (Vardhangad)  वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयगड (Vijaygad)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))
 विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)  वाघेरा किल्ला (Waghera)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))
 यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))