मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मदनगड (Madangad) किल्ल्याची ऊंची :  4900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नाशिक श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.
3 Photos available for this fort
Madangad
Madangad
Madangad
Madangad
Madangad
पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.

१ आंबेवाडी मार्गे :-
मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा - घोटी - पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे.
आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय.
येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्‍या लागतात.या पायर्‍या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.

२ घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर :-
किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.
राहाण्याची सोय :
गडावर एक गुहा आहे. यात साधारण ३० जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात
सूचना :
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
श्रेणी: Very difficult
 अलंग (Alang)  अणघई (Anghai)  औंढा (अवंध) (Aundha)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चांदवड (Chandwad)  गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  लिंगाणा (Lingana)
 मदनगड (Madangad)  मलंगगड (Malanggad)  पदरगड (Padargad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)
 तैलबैला (Tailbaila)