मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) किल्ल्याची ऊंची :  2400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी
पाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे . एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे . गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे.

हिडकल डॅम जवळ असलेला होन्नुर किल्ला आणि त्याच्या पुढे १४ किलोमीटरवर असलेला पाच्छापूर किल्ला एका दिवसात पाहाता येतात.
6 Photos available for this fort
Pachhapur Fort
पहाण्याची ठिकाणे :
पाच्छापूर गावाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पाच्छापूर किल्ला आहे . टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे . गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही एक तटबंदी आणि प्रवेशव्दार होती . किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना एक प्रवेशद्वार लागते. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे . याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण एका भव्य प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ , दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारासमोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे . प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे . मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा . किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता येत नाहीत .
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - बंगलोर महामार्गावर हिडकल डॅमला जाणारा फाटा आहे . त्या रस्त्याने हिडकल डॅमच्या पुढे १४ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर गाव आहे . या गावात पाच्छापूर किल्ला आहे .
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Pali   Pachhapur   7.15,9.45,11,13.30,14.45,18,20.15   -   

जिल्हा Belgaum
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)  काकती किल्ला (Kakati Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)
 राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  सडा किल्ला (Sada Fort)  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))