मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पालचा किल्ला (Pal Fort) किल्ल्याची ऊंची :  1302
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पाल - यावल, सातपुडा
जिल्हा : जळगाव श्रेणी : सोपी
पाल हे खानदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे . येथे वनविभागाचे विश्रांतीगृह आहे . हे विश्रांतीगृह पाल किल्ल्यात आहे. सातपुडा पर्वत रांगेतून जाणाऱ्या घाटमार्गावर (व्यापारी मार्गावर) लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती . पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.

1 Photos available for this fort
Pal Fort
पहाण्याची ठिकाणे :
पाल किल्ल्याचे प्रवेशद्वार अजूनही भक्कम स्थितीत उभे आहे . वनविभागाने त्याची रंगरंगोटी केलेली आहे . या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर वनविभागाचे विश्रांतीगृह आहे . या विश्रांतीगृहाच्या मागे पाल किल्ल्याचे बुरूज कसेबसे तग धरुन उभे आहेत. किल्ल्याचे बाकीचे अवशेष नष्ट झाले आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
पाल जवळचे सर्वात मोठे गाव आणि रेल्वे स्टेशन भुसावळ येथे आहे . भुसावळ - यावल अंतर ४९ किलोमीटर आहे.
राहाण्याची सोय :
वन विश्रामगृहात राहाण्याची व्यवस्था आहे पण त्याचे बुकींग आधी करावे लागते .
जेवणाची सोय :
वन विश्रामगृहात जेवणासाठी सोय होते .
पाण्याची सोय :
वन विश्रामगृहात पिण्याचे पाणी आहे .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Jalgaon
 अंमळनेर (Amalner)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))
 पालचा किल्ला (Pal Fort)  पारोळा (Parola)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))