पालगड
(Palgad) |
किल्ल्याची ऊंची : 
1328 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : रायगड |
श्रेणी : मध्यम |
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. इतिहासात फारस काही न घडलेला हा किल्ला पालगड गावाच्या मागे दाट झाडीत उभा आहे. खेड - दापोली रस्त्यावर असलेले हे गाव साने गुरुजींच जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
१५ एकर क्षेत्रफळाच्या पसरलेल्या या किल्ल्याचे पूर्वाभिमूख प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे, परंतू बुरुज अजून शाबुत आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक तोफ आकाशाकडे तोंड करुन पूरलेली आहे. अशीच दूसरी तोफ होळीच्या माळावर व तिसरी तोफ गावात विहिरीजवळ शेतात पूरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर वाड्र्यांचे काही जोते आहेत. तेथून पूढे गेल्यावर एक सुकलेल टाक आहे. गडाच्या निमूळत्या होत गेलेल्या सोंडेच्या टोकाला बुरुज आहेत. गडाची तटबंदी थोड्याफार प्रमाणात शाबूत आहे. गडाच्या माचीवर वस्ती आहे.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
१) पालगड गाव दापोलीपासून २१ किमीवर, दापोली - खेड मार्गावर आहे. पालगड माचीपर्यंत गाडी रस्ता आहे. तेथून हनूमान मंदिरा जवळून वाट किल्ल्यावर जाते. २) खेड - जामगे रस्त्यावरील कदमवाडीतूनही किल्ला सर करता येतो.
|
राहाण्याची सोय : |
गडावर राहण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही. |
पाण्याची सोय : |
गडावर पाण्याची सोय नाही. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
किल्ल्यावर जाण्यासाठी पालगड माचीवरुन ३० मिनीटे लागतात व पालगड गावातून १ तास लागतो. |