मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पांडवगड (Pandavgad) किल्ल्याची ऊंची :  4185
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
वाई गावाला खेटूनच उभा असलेला पांडवगड त्याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे नेहमी लक्ष वेधून घेतो. माथ्यावर कातळ भिंतिचा मुकुट परिधान केलेला हा किल्ला वाईहून सहज पायी जाता येण्यासारखा आहे. वाई मांढरदेव मार्गावर हा गड आहे.
6 Photos available for this fort
Pandavgad
Pandavgad
Pandavgad
इतिहास :
चालुक्र्‍यांच्या राज्र्‍यांनतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१ - १९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला, असे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहु महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला इ.स १८१८ मध्ये इगजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला.
पहाण्याची ठिकाणे :
मेणवली गावातून आपण पहिल्या माचीवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर लागते. त्याच्या बाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. तेथे कातळात कोरलेल्या काही पायर्‍या आहेत. येथून साधारण १५ ते २० मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पायर्‍र्‍यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर आपण माची सारख्या भागात प्रवेश करतो. गडाच्या उत्तरबाजुला काही टाकी आढळतात. समोरच पारश्याचा एक बंगला आहे. बंगल्या समोरच कुंपण घातलेले एक टाके आहे. येथून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष दिसतात, तर एका ठिकाणी सलग सहा पाण्याची टाकी आढळतात, त्यापैकी एक पाण्याचं टाकं मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांब देखील आहेत. गावकर्‍र्‍यांच्या मते टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. येथूनच एक पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काहीश्या पायर्‍या व तटबंदी शिल्लक आहे. डावीकडे गेल्यावर एका उघड्या मंदिरात दगडात कोरलेली मारुतीची मूर्ती दिसते. पुढे काही अंतरावर पांडजाई देवीचे मोडकळीस आलेले मंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर एक तळे आहे, आता मात्र सुकलेल्या अवस्थेत आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस इमारतीचे काही अवशेष दिसतात. या इमारतीचा पाया ३० फुट रुंद असा आहे. तसे पाहिले तर बालेकिल्ला फारच छोटा आहे. गडाच्या उत्तरेकडे थोडेसे पठार आहे. लोहगडाच्या विंचुकाट्या सारखा थोडा भाग पुढे आला आहे. गडाच्या पूर्वेकडून एक वाट धावडी गावात उतरते. याच गावा जवळ पांडवलेणी आहेत. आपण जेव्हा मेणवली गावाकडून गडावर येतो, तेव्हा जे पहिले प्रवेशद्वार आहे. तेथून गडाचा संपूर्ण घेरा ही खाजगी मालमत्ता आहे. या मागची घटना अशी की पांडवगड कोण्या एका सरदाराची मालमत्ता होती. यानंतर मॅफको कंपनीने तो विकत घेतला. सध्या श्री सर्वोदय वाडीया नावाचे गृहस्थ केअरटेकर म्हणून राहतात. त्र्‍यांनी गडावर मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्र्‍यांना कुंपण घातले आहे. या गृहस्थाने गडावर एक फलक देखील लावला आहे, त्याद्वारे गडावर मद्यप्राशन ,धुम्रपान मादक पदार्थ सेवनास बंदी घातली आहे. सर्व गड फिरण्यास दोन तास पुरतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मेणवली गावातून :-
वाई ते मेणवली सतत गाड्यांची ये जा चालू असते. मेणवली गावा जवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे, तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो. समोर असणा‍‍र्‍या पठारावर गेल्यावर दोन वाटा फुटतात. येथपर्यंत येण्यासाठी गावातून अर्धातास लागतो. दोन वाटांपैकी एक वाट लांबची आणि वळसा घालून जाणारी आहे. पहिल्या वाटेने पायथ्यावरुन गडावर जाण्यास १ तास लागतो. या पठारावर कोळी लोकांची वस्ती आहे.

२) गुंडेवाडी गावातून :-
दुसरी वाट गुंडेवाडी गावातून वर जाते. वाई - धावडी मार्गे गुंडेवाडी गावातून वर पोहचावे. गुंडेवाडी गावातून चांगली मळलेली आणि काही ठिकाणी अलिकडेच बांधलेल्या पायर्‍यांची सोपी वाट आहे. यावाटेने गडमाथा गाठण्यास २ तास पुरतात.
राहाण्याची सोय :
१) श्री. सर्वादय वाडीया यांच्या घराबाहेरील शेड मध्ये १० जणांना राहता येते.
२) पांडजाई देवीच्या मंदीरात १० ते १५ जणांना राहता येते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मेणवली मार्गे १ तास लागतो, तर धावडी मार्गे २ तास लागतात.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Vai   Menavali   From 6.00 to 19.30 after every half and hour   -   

जिल्हा Satara
 अजिंक्यतारा (Ajinkyatara)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भूषणगड (Bhushangad)  चंदन वंदन (Chandan-vandan)
 दातेगड (Dategad)  गुणवंतगड (Gunawantgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  केंजळगड (Kenjalgad)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महिमानगड (Mahimangad)
 पांडवगड (Pandavgad)  पाटेश्वर (Pateshwar)  प्रतापगड (Pratapgad)  सदाशिवगड (Sadashivgad)
 सज्जनगड (Sajjangad)  संतोषगड (Santoshgad)  वैराटगड (Vairatgad)  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)