मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रसाळगड (Rasalgad) किल्ल्याची ऊंची :  1800
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रसाळगड - सुमारगड - महीपतगड
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर - कोयना डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड, सुमारगड व महीपतगड हे तीन किल्ले आहेत. यापैकी रसाळगडाची उंची सर्वात कमी आहे. हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स रसाळगड - सुमारगड - महीपतगड असा ट्रेक करतात. किंवा महीपतगड - सुमारगड - रसाळगड असाही ट्रेक करतात.

46 Photos available for this fort
Rasalgad
Rasalgad
Rasalgad
Mahipat-Sumar-Rasal Rasta
Mahipat-Sumar-Rasal Rasta
पहाण्याची ठिकाणे :
रसाळगडाचा आकार त्रिकोणी आणि घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस दोन ते अडीच तास लागतात. पेठ वाडीतून किल्ल्यावर शिरताना उजव्या हाताला एक शिवलिंग लागते. याच्या बाजूने एक पायवाट खाली डांबरी रस्त्याकडे तर एक पायवाट एका भुयारी टाक्याकडे जाते. अरुंद वाट व गवत यामुळे या गुहेकडे जाणं कठीण आहे. शिवलिंगाकडून किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या दरवजाच्या डाव्या बाजूने खालच्या बाजूला 2/3 पाण्याची टाकी आहेत. ती पाहून पहिल्या दरवाजातून पायऱ्यानीं आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. इथून थोडं पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा तिसरा उ्दध्वस्त दरवाजा दिसतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक तोफ तसेच समोरच्या तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत. उजव्या तोफच्या बाजूला एक खराब टाकं आहे तिथून मागच्या बाजूला थोडे उंचावर चालत गेल्यावर टोकाला पिर बुरुज आहे. यावर एक तोफ आणि बाजूला 2 तोफा ठेवलेल्या दिसतात.
त्या तोफा पाहून परत प्रवेशद्वारा जवळच्या पहिल्या तोफेजवळ यावे व समोरच्या दिशेने पठारावर चालायला सुरुवात करावी. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर पठारावर एक तोफ जमिनीवर ठेवलेली दिसते. तोफे पासून काही अंतरावर उजव्या बाजूला 2/3 उ्दध्वस्त वास्तूंचे चौथरे दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर समोरच मंदिर दिसू लागते. मंदिराजवळ जात असताना उजव्या बाजूला तटबंदी जवळ 2 तोफा एकमेकांपासून काही अंतरावर ठेवलेल्या दिसतात. 2/3 मिनिटात आपण मंदिराजवळ पोहोचतो. इथे मंदिराच्या बाहेर ओट्यावर ६ तोफा रांगेत ठेवलेल्या दिसतात. मंदिरासमोर दीपमाळ व वृंदावन आहे. हे मंदिर श्री वाघजाई, भैरी व झोलाई देवी यांच असून मंदिराच्या एका भिंतीत अनेक पुरातन मूर्ती ठेवलेल्या दिसतात. देवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या हाताला पाण्याचे देव टाकं व डाव्या हाताला एक खराब पाण्याचं टाकं लागतं. देव टाकाच्या बाजूला गणपती मंदिर असून त्याच्या बाजूला पूर्वीची गणपतीची भग्न मूर्ती ठेवलेली दिसते. इथून देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यावर महिषासूरमर्दिनीच्या दोन मूर्ती ठेवलेल्या दिसतात. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला तटबंदीजवळ एक खराब पाण्याचं टाकं देखील आहे. हे सर्व पाहून परत देव टाक्याजवळ आल्यावर समोरच आपल्याला बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते. बालेकिल्ल्याला ४ बुरुज असून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला तुळशी वृंदावन, चुन्याचा घाणा तसेच उ्दध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला जो बुरुज आहे त्यात 3 तोफा ठेवलेल्या दिसतात.

तोफा पाहून पुढे गेल्यावर पश्चिम दिशेला बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा दिसतो. या दरवाजातून बाहेर गेल्यावर रसाळगडाचे दक्षिण टोक आणि निशाण बुरुज दिसतो. तो पाहून परत मागे फिरावे आणि पूर्व दिशेला मार्गक्रमण करावे. पूर्व दिशेला जात असताना काही तलाव व पाण्याची टाकी लागतात. ती पाहून समोर चालत गेल्यावर एक कोठार लागते. या कोठाराच्या दोन दरवाजांवर गणपती तसेच एका दरवाजाच्या उंबरठ्यावर कीर्तीमुख आहे. ते पाहून पुढे प्रयाण करत असताना उजव्या बाजूला तटबंदीच्या खालच्या बाजूला मायाबा काळकाई देवी मंदिर लागते. या मंदिरात काळकाईची मूर्ती तसेच शिवलिंग व ठेवले आहे तसेच मंदिरा बाहेर नंदी व गजलक्ष्मीची मूर्ती आहे. ते पाहून परत पठारावर यावे व गडाच्या पूर्व टोकाकडे वाटचाल सुरु ठेवावी. ही वाटचाल करताना वाटेत पावसाळी तलाव, उ्दध्वस्त वास्तू, खराब टाकं तसेच काही समाध्या दिसतात. त्या पाहून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पूर्व बुरुज म्हणजेच पुसाटी बुरुजावर पोहोचतो. पुसाटी बुरुजावरून खाली उतरून पुढे गेल्यावर कड्यात 2/3 भुयारी पाण्याची टाकी लागतात तसेच बुरुजच्या उजव्या हाताला खाली एका उरुंद रस्त्याने उतरल्यावर डोंगर कड्यात एक खांब टाकं लागतं. वाढलेलं गवत व अरुंद रस्ता यामुळे इथे जाणं अतिशय कठीण आहे. हे टाकं पाहून परत पूर्व बुरुजावर यावे व आपला परतीचा प्रवास सुरु करावा.
पोहोचण्याच्या वाटा :
१) खेड वरून वाडी पेठला (रसाळगडाच्या पायथ्याचे गाव ) दिवसातून 2/3 बस जातात. किंवा खाजगी वहानाने पाऊण तासात आपण वाडी पेठला पोहोचतो. वाडी पेठ मधून 20 मिनिटात आपण गडावर पोहोचतो.
२) महिपतगडवरून सुमारगड मार्गे :-
महिपतगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा रसाळगड गाठता येतो. हे अंतर साधारणतता ८ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे. त्यामुळे वाटाड्या बरोबर घ्यावा,
राहाण्याची सोय :
झोलाई देवीच्या मंदिरात व बाहेरील ओट्यावर ६0 ते ७0 माणसे राहू शकतात. बाहेरील ओट्यावर झोपल्यास सापांची काळजी घ्यावी.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही पण गडाखाली वाडी पेठमध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गडावरील देव टाक्यात पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे. वाडी पेठ मध्ये मात्र डिसेंबर नंतर पाण्याची कमतरता जाणवते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाडी पेठ मधून गडावर जाण्यास 20 मिनिटे लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)