मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सप्तश्रुंगी (Saptashrungi) किल्ल्याची ऊंची :  4600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.
6 Photos available for this fort
Saptashrungi
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहेमंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून वरच्या भागात गड आहे. परंतू हा श्रध्देचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडी रस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात. नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
नांदुरी गावातून अर्धातास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुत.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...