मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सिध्दगड (Sidhhagad) किल्ल्याची ऊंची :  3250
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा : ठाणे श्रेणी : कठीण
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल विविध व्यापारी मार्गांनी घाटमाथ्यावर असलेल्या जुन्नर या बाजारपेठेच्या गावात जात असे. त्यापैकी एक व्यापारी मार्ग कल्याण - म्हसा - अहुपे घाट - जुन्नर हा होता. म्हसा याठिकाणी कर्जत कडून येणारा मार्गही कल्याण कडून येणार्‍या मार्गाला मिळतो. या व्यापारी मार्गावर आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी मच्छिन्द्रगड, गोरखगड आणि सिध्दगड या किल्ल्यांची निर्मिती केली होती. सिध्दगड किल्ला हा भिमाशंकर अभयारण्याचा भाग झाला आहे . सिध्दगड माचीवर असलेले गाव विस्थापित होणार आहे अशा बातम्या अधून मधून येत असतात. त्यामुळे तेथे जाणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. तसेच हा गडपरिसर वनखात्याच्या जागेत असल्यामुळे इथे फिरण्यावर बंधने आहेत.

10 Photos available for this fort
Sidhhagad
पहाण्याची ठिकाणे :
नारीवली गावातून येणार्‍या वाटेने आपला प्रवेशव्दारातून सिध्दगड माचीवर प्रवेश होतो. सिध्दगड माचीवर गाव (सिध्दगडवाडी) आहे. माचीवर देऊळ आहे देवळा जवळ शिलालेख, वीरगळी पाहायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजूला तोफ़ आणि तोफेचे गोळे आहेत. सिध्दगड माची वरून सिध्दगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जातांना दोन कातळात खोदलेल्या गुहा आढळतात. यातील दुसऱ्या गुहेपासून पुढे बाले किल्ल्यावर जाणारी वाट अतिशय बिकट व अरुंद आहे. माथ्यावर बुरुज व पाण्याचे टाके आहेत. माचीवरून गडावर जाण्यासाठी गावातून गाईड घेणे आवश्यक आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
जांबुर्डे मार्गे–
कल्याणहून एसटी बसने मुरबाड गाठावे. मुरबाडहून एसटीने किंवा जीपने म्हसा गाव गाठावे. कल्याण - म्हसा अंतर ४२ किलोमीटर आहे. म्हसा गावातून जांबुर्डे गाव ५ किलोमीटर अंतरावर आहे. म्हसा गावातून रिक्षा, जीप किंवा एसटीने जांबुर्डे गाव गाठावे. गावात धरण आहे. धरणाच्या पुढे वनखात्याचे चेकपोस्ट आहे. चेकपोस्टच्या पुढे कच्च्या रस्त्याने चालत गेल्यावर ६-७ घरांची वस्ती असलेले एक गाव लागते. या गावाच्या शेवटी विहिर आहे. या विहिरीच्या पुढे डाव्या बाजूने जाणारी वाट सिध्दगडला जाते. पण हा मार्ग वनखात्याच्या हद्दीतून (भिमाशंकर अभयारण्यातून) जात असल्यामुळे वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. हा मार्ग सोपा व कमी वेळ लागणारा आहे. यामार्गाने आपण प्रवेशव्दाराच्या विरुध्द बाजूला माचीवर (सिध्दगडवाडीत) पोहोचतो.

२) नारिवली मार्गे–
जांबुर्डे गावाच्या पुढे ६ किलोमीटरवर असलेल्या नारिवली गावातून सिध्दगडवर जाण्याचा मार्ग आहे. गावाबाहेरील शेतांमधून सिध्दगडच्या दिशेने चालत जाताना थोडे अंतर गेल्यावर नदीवरील पूल लागतो, तो ओलांडून पुढे गेल्यावर सिध्दगडकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गाने वर जात असताना डाव्या बाजूला गोरखगड, मच्छिंद्रगड व त्यापुढील डोंगरावर ऐतोबा मंदिर दिसते. हा मार्ग सिध्दगडवाडीच्या माचीवर असलेल्या पुरातन दरवाज्यातून वर येतो.
राहाण्याची सोय :
सिध्दगडवाडीतील (माची) देवळात १०-१५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
सिध्दगड वाडीतील (माची) गावात जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
जांबुर्डे ते सिध्दगडवाडी (माची) - ३ तास लागतात. नारिवली ते सिध्दगडवाडी (माची) - ४ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
श्रेणी: Hard
 भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  बितनगड (Bitangad)  चंदेरी (Chanderi)
 दार्‍या घाट (Darya Ghat)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  गोरखगड (Gorakhgad)  कलाडगड (Kaladgad)
 कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खैराई किल्ला (Khairai)  कुलंग (Kulang)
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोरगिरी (Morgiri)  न्हावीगड (Nhavigad)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)
 प्रचितगड (Prachitgad)  रवळ्या (Rawlya)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  सिध्दगड (Sidhhagad)