मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

ताहुली (Tahuli) किल्ल्याची ऊंची :  3487
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
माथेरान डोंगररांगेत हा डोंगर आहे. हा डोंगर त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अनगड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.
6 Photos available for this fort
Tahuli
पहाण्याची ठिकाणे :
ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ’दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ’दाऊद’ तर दुसर्‍यांचे नाव ’बामण’ आहे.


पोहोचण्याच्या वाटा :
ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

१) अंबरनाथहून :-
अंबरनाथ स्थानकात उतरून पूर्वेला बाहेर पडावे. रिक्षा किंवा बसने बदलापुर (पाईप लाईन रोड) रस्ता ओलांडावा. येथे काकुली नावाचा तलाव आहे. इंग्रजांनी बांधलेल्या या तलावातून कल्याण स्थानकात येणार्‍या कोळशाच्या रेल्वे इजिंनाना पाणी पुरवले जात असे. त्यासाठी वापरण्यात येणारी १९१४ साल (वर्ष) कोरलेली पाईप लाईन आजही पाहायला मिळते. या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावर एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात.

२ कुशीवलीहून :-
कल्याण - मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरावे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यामधून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.
राहाण्याची सोय :
डोंगरावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
डोंगरावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) कुशीवली मार्गे अडीच तास लागतात. २) काकुली लेक मार्गे चार तास लागतात.
डोंगररांग: Matheran
 चंदेरी (Chanderi)  ईरशाळ (Irshalgad)  कर्नाळा (Karnala)  मलंगगड (Malanggad)
 पेब (विकटगड) (Peb)  प्रबळगड (Prabalgad)  सोंडाई (Sondai)  ताहुली (Tahuli)