मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

तोरणा (Torna) किल्ल्याची ऊंची :  1400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
3 Photos available for this fort
Torna
Kille Torna
Kille Torna
इतिहास :
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
पहाण्याची ठिकाणे :
पोहोचण्याच्या वाटा :
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.
राहाण्याची सोय :
गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) वेल्हेमार्गे अडीच तास लागतात. २) राजगड - तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Swargate   Velhe   6:15, 7:30, 8:00, 8:30, 9:30, 10:00, 11:15, 11:45,   -   10

डोंगररांग: None
 आड (Aad)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)
 अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)
 बाणकोट (Bankot)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भवानगड (Bhavangad)
 भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूषणगड (Bhushangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  घारापुरी (Gharapuri)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  गोवा किल्ला (Goa Fort)
 होन्नुर किल्ला (Honnur Fort)  इंद्रगड (Indragad)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जयगड (Jaigad)
 जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  जंजिरा (Janjira)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कलाडगड (Kaladgad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खांदेरी (Khanderi)  खारेपाटण (Kharepatan fort)
 खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोर्लई (Korlai)  कोटकामते (Kotkamate)  माचणूर (Machnur)
 मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मंगळवेढा (Mangalwedha)  माणिकगड (Manikgad)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पालगड (Palgad)  परांडा (Paranda)
 पारडी किल्ला (Pardi Fort)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रचितगड (Prachitgad)  पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)
 रायकोट (Raikot)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजकोट (Rajkot)  रामदुर्ग (Ramdurg)  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)
 सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुरगड (Surgad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  टकमक गड (Takmak)
 तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  थाळनेर (Thalner)  तोरणा (Torna)  उंदेरी (Underi)
 वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वसई (Vasai)  विजयदुर्ग (Vijaydurg)
 वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))