मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

तुंग (Tung) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणार्‍या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.किल्ला चढण्यास फारच सोपा आहे.
6 Photos available for this fort
Tung
Tung
Tung
Tungi (Karjat)
Tungi (Karjat)
इतिहास :
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा छोटा असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायर्‍या लागतात. पायर्‍यांच्या वाटेत थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.

बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

पोहोचण्याच्या वाटा :
या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

१) घुसळखांब फाट्यामार्गे :-
गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहोचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एसटी पकडून २६ किमी अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ किमी अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.


२) ब्राम्हणोली - केवरे
अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.


३) तुंगवाडीच्या फाट्या मार्गे :-
जर लाँचची सोय उपलब्ध नसेल तर, तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एसटी महामंडाळाची कामशेत - मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहोचतो.

राहाण्याची सोय :
तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे देखील मंदिर आहे. यात २० जणांना राहता येते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
तुंगवाडीतून ४५ मिनिटे लागतात.
सूचना :
१) स्वत:चे वाहन असल्यास मुंबई आणि पुण्याहून तुंग व तिकोना हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
२) तिकोनाची माहिती साईटवर दिलेली आहे.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Lonavala   Tungwadi   17.00   -   

डोंगररांग: Lonavala
 कोरीगड (कोराईगड) (Korigad)  लोहगड (Lohgad)  मोरगिरी (Morgiri)  मृगगड (Mrugagad)
 राजमाची (Rajmachi)  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  तैलबैला (Tailbaila)
 तिकोना (Tikona)  तुंग (Tung)  उंबरखिंड (Umberkhind)  विसापूर (Visapur)