मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

विसापूर (Visapur) किल्ल्याची ऊंची :  3038
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा हा विसापूर किल्ला, लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता.
12 Photos available for this fort
Visapur
Visapur
Visapur
इतिहास :
विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
पहाण्याची ठिकाणे :
पायर्‍यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - पुणे लोहमार्गावर मळवली रेल्वे स्टेशनला उतरुन मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाच्या (एक्सप्रेस वे) वरुन जाणार्‍या रस्त्याने महामार्ग ओलांडल्यावर दोन रस्ते फ़ुटतात. उजवी कडील रस्ता मळवली व भाजे लेण्यांकडे जातो. तर डावीकडील रस्ता पाटण गावाकडे जातो.

भाजे मार्गे :- भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहोचतो येथे बाजूलाच एक मंदिर आहे. येथून २.५ ते ३ तासात गडावर जाता येते.
२) दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. खिंडी पर्यंत जाण्यात १.५ ते २ तास लागतात . खिंडीतून एक वाट लोहगड किल्ल्याकडे व दुसरी वाट गायमुख खिंडीतून डावीकडे जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते. गायमुख खिंडीतून गडावर जाण्यास पाऊण तास लागतो.

पाटण मार्गे :- मळवली रेल्वे स्टेशनला उतरुन मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाच्या (एक्सप्रेस वे) वरुन जाणार्‍या रस्त्याने महामार्ग ओलांडल्यावर दोन रस्ते फ़ुटतात. उजवी कडील रस्ता मळवली व भाजे लेण्यांकडे जातो. तर डावी कडील रस्ता पाटण गावाकडे जातो. मळवली स्टेशन ते पाटण गाव हे अंतर चालत जाण्यासाठी २० मिनिटे लागतात. पाटण गावातील वस्तीच्या पुढे एक प्रवेशव्दार बनवलेले आहे तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. येथून दिड ते २ तासात गडावर जाता येते. वाटेला अनेक फाटे फ़ुटतात , काही ठिकाणी वाट जंगलातून जाते त्यामुळे गावातून वाटाड्या घ्यावा.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
भाजे गावातून अडीच तास लागतो.
सूचना :
विसापूर व भाजे लेणी एका दिवसात व्यवस्थित पाहून होतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विजयगड (Vijaygad)
 विलासगड (Vilasgad (Mallikarjun))  विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)